शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लालपरी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागात सुरू असलेली बस सेवा बंद करण्यात ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागात सुरू असलेली बस सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्याने येथील आगारातून ग्रामीण भागासाठी लालपरी सोमवारपासून धावू लागल्याने प्रवाशांची हेळसांड थांबणार आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची पहिली लाट आल्याने ग्रामीण भागात अनेक महिने बस सेवा बंद करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात सुरळीत सुरू झालेली बससेवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरळीत सुरू झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होताच मार्चमध्ये ही बससेवा पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आली. ७ जूनपासून केवळ शहरी भागात बससेवा सुरू करण्यात आली होती. परंतु ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सुरुवातीपासून जास्त असल्याने ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्यात आली नव्हती.

सध्या बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याने येथील आगार प्रमुख दत्तात्रय काळम पाटील यांनी सोमवारपासून तालुक्यातील आबेगाव, पुरुषोत्तमपुरी, गुंजथडी, मंजरथ, हिवरा, टाकरवण, जीवनापूरसह अनेक गावात सोमवारपासून बससेवा सुरू करण्यात आली. यामुळे ३०-४० गावच्या प्रवाशांचा इतर शहरांशी संपर्क जोडला जाऊ लागला. यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जाऊ लागला आहे.

प्रवाशांची अडवणूक थांबणार

ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना इतर गावाशी ये-जा करण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागत होता. या अवैध प्रवासी वाहनधारकांकडून प्रवाशांची अडवणूक करण्यात येऊन मनमानी भाडे आकारून जोपर्यंत गाडी भरत नाही तोपर्यंत अडवून ठेवण्यात येत असल्याने प्रवासी खूपच हैराण झाले होते.

सध्या माजलगाव आगारातून ७ ते ८ ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली. सध्या प्रत्येक गावाला संध्याकाळी अशा दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच प्रत्येक गावाला बससेवा पुन्हा सुरू करण्याचा आमचा मानस आहे.

-दत्तात्रय काळम पाटील

आगार प्रमुख, माजलगाव

060721\img_20210613_134005_14.jpg