अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:28 PM2022-07-30T18:28:17+5:302022-07-30T18:29:07+5:30

अपहरण केल्यानंतर लग्नाचे आमिष देऊन केला अत्याचार

Kidnapped and raped a minor girl; A case has been registered against three | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

Next

माजलगाव (बीड): घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी पोस्कोसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फेब्रुवारी २०२१ मध्ये एक १७ वर्षी मुलगी गावाकडून शहरात कार्यक्रमानिमित्त आली होती. त्यादरम्यान शेख अल्ताफ नामक युवकाशी तिचा परिचय झाला होता. गावी परत गेल्यानंतरही अल्ताफ मोबाईलच्या माध्यमातून मुलीच्या संपर्कात होता. त्याने मुलीला लग्नाचे आमिष देत गुंतवून ठेवले. दरम्यान, २४ जून २०२२ मध्ये पुन्हा ती मुलगी शहरात नातेवाईकाकडे एका कार्यक्रमानिमित्त आली होती. नातेवाईक खरेदीसाठी बाहेर गेल्यानंतर मुलगी एकटी असल्याची संधी साधून शेख अल्ताफ व त्याचे दोन भाऊ सुलतान व आशु घरात घुसले. तिघांनी मिळून मुलीचे अपहरण करून तिला दुसऱ्या शहरात आणले. 

अल्ताफने त्याच्या मित्राच्या खोलीवर २५ ते २७ जून दरम्यान लग्नाचे आमिष देऊन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर २८ जून रोजी अल्ताफ मुलीला घेऊन माजलगावी आला. पिढीत मुलीने अल्ताफने लग्नाची आमिष दाखवून अत्याचार केल्याचे आईस सांगितली. दरम्यान २९ जुलै शुक्रवारी  रात्री उशिरा पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी शेख अल्ताफ, शेख सुलतान, शेख आशु विरुद् अपहरणासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Kidnapped and raped a minor girl; A case has been registered against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.