मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST2021-03-26T04:33:39+5:302021-03-26T04:33:39+5:30

भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. ...

Invitation to an accident due to Mokat cattle | मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण

मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण

भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ

अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत चालला आहे तरीही या भरधाव वाहनधारकांना पोलिसांकडून गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.

धारूर घाटात कठडे तात्काळ उभारावे

धारूर : धारूर ते तेलगाव रस्त्यावरील धारूर घाटात दरीच्या बाजूने कठडे उभारावे. कठड्यांची उंची रस्त्याच्या बरोबरीने झाल्याने व अनेक ठिकाणी कठडे पडल्याने वाहनचालकांत भीती निर्माण होत आहे. प्रवाशांना घाटातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ या कठड्यांची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे.

Web Title: Invitation to an accident due to Mokat cattle