भोळसर व्यक्तीला तीन महिन्यांनंतर मिळाले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:13+5:302021-06-23T04:22:13+5:30

जळगाव मजराकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन तलवाडा : गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील कालवी या गावातून निघून आलेल्या व्यक्तीस जळगाव ...

The innocent man got the house after three months | भोळसर व्यक्तीला तीन महिन्यांनंतर मिळाले घर

भोळसर व्यक्तीला तीन महिन्यांनंतर मिळाले घर

जळगाव मजराकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

तलवाडा

: गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील कालवी या गावातून निघून आलेल्या व्यक्तीस जळगाव मजरा येथील तरुणांसह गावकऱ्यांनी चौकशी करत त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या शिवाजी चंद्रमोरे यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोच करून माणुसकीचे दर्शन घडवल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद खुणे व ग्रामस्थांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तालुक्यातील जळगाव मजरा येथे दोन दिवसांपूर्वी एक भोळसर व्यक्ती चुकून गावात आली होती. दरम्यान, यावेळी त्यांना गावातील गोविंद खुणे यांच्यासह काही तरुणांनी विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, मी शिवाजी वामन चंद्रमोरे असून, (रा. कालवी, ता. नाशिक, जि. नाशिक) या गावचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना जेवण खाऊ घालत गावातील मंदिरात झोपण्याची व्यवस्था केली.

नाशिक जिल्ह्यातील कालवी या गावातील सरपंच यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून त्यांच्यामार्फत या व्यक्तीच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही खूप दिवसांपासून शोधत आहोत. त्यांना तुमच्या गावात थांबून ठेवा, आम्ही लगेच येतो. यानंतर दुसऱ्याचदिवशी त्याचे सर्व कुटुंबीय त्या व्यक्तीला नेण्यासाठी आले असता, येथील ग्रामस्थांनी त्यांना श्रीफळ, टॉवेल, टोपीचा आहेर करून सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.

Web Title: The innocent man got the house after three months