चोऱ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:28 IST2021-01-17T04:28:45+5:302021-01-17T04:28:45+5:30

बाजारतळाची दुरवस्था बीड : तालुक्यातील चौसाळा येथील आठवडी बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना तसेच ...

Increase in thefts | चोऱ्यांत वाढ

चोऱ्यांत वाढ

बाजारतळाची दुरवस्था

बीड : तालुक्यातील चौसाळा येथील आठवडी बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून बाजारतळाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

कारवाईची मागणी

बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत.

रॅकेट सक्रिय

माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

कचऱ्याचे ढिगारे

बीड : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई करण्यात येत नाही. गोदामाच्या जागेवर कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे

Web Title: Increase in thefts