शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तमपुरीत रिक्षाचालकांची रोडवरील मस्ती भाविकांना भोवली;अपघातात २ महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:52 IST

बेशिस्त रिक्षाचालक एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात हूल देताना अपघात होत आहेत

- पुरुषोत्तम करवा
माजलगांव:
 पुरुषोत्तमपुरीचा रस्ता हा भाविकांसाठी काळ ठरु लागला आहे. चारच दिवसांपूर्वी भाविकांची वाहतूक करणारा अॅटोरिक्षा उलटल्याची घटना ताजी असताना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हूल देण्याच्या प्रयत्नात दोन रिक्षांचा अपघात झाला. यात दोन महिला भाविक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथून बालाजीनगर भागात राहणाऱ्या सुमारे ५० महिला भाविक खाजगी ट्रॅव्हल्सने पुरुषोत्तमपुरीत दर्शनासाठी आल्या होत्या. पुरुषोत्तमपुरी फाटयापासुन ते गावापर्यंतचा सुमारे ३ कि.मी. ऑटोरिक्षांनी जावे लागते. सुरुवातीला ट्रस्टच्यावतीने खाजगी बस लावून गावापर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी असलेल्या तसेच आजुबाजुच्या गावांतील अॅटोरिक्षावाल्यांनी मुजोरी करीत ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेली व्यवस्था बंद पाडली. 

रिक्षा चालकांची मनमानी
येथे अॅटो रिक्षा चालकांची मनमानी सुरू आहे. मनमानी भाडे वसूल करुन रत्यावर बेशिस्तपणे रिक्षा चालवली जात असल्आयाने अपघात नित्य झाले. एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात हूल देताना अपघात होत असल्याची माहिती रिक्षातील भाविकांनी दिली. रिक्षा चालकांच्या एकमेकांच्या स्पर्धेचा परिणाम हा भाविकांना भोगावा लागत असून छत्रपती संभाजीनगर येथील पुजा गणेश यशवंते (३०), संगीता गुलाबराव सोनवणे (५५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना गावातील उमेश गोळेकर, गोविंद गोळेकर, संदीप शेळके व वसंत लोखंडे या युवकांनी जखमींना उपचारासाठी माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादBeedबीड