तालखेडमध्ये घर फोडून ५० हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST2021-02-10T04:34:48+5:302021-02-10T04:34:48+5:30

सय्यद युसफ सय्यद अब्दुल करीम यांचे गावातच चप्पल-बुटाचे दुकान आहे. सोमवारी युसूफ व त्यांची पत्नी नुराबी, मुलगा ईद्रीस हे ...

Home burglary and theft of Rs 50,000 in Talkhed | तालखेडमध्ये घर फोडून ५० हजारांची चोरी

तालखेडमध्ये घर फोडून ५० हजारांची चोरी

सय्यद युसफ सय्यद अब्दुल करीम यांचे गावातच चप्पल-बुटाचे दुकान आहे. सोमवारी युसूफ व त्यांची पत्नी नुराबी, मुलगा ईद्रीस हे जेवण करून साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुकानासमोरील राहत्या घरात झोपले असता, मध्यरात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी २३ हजार रुपये नगदी व ८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. युसूफ यांनी सकाळी दुकान उघडले असता, दुकानाच्या पाठीमागील घराचे कुलूप तुटलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी घरातील पत्र्याच्या पेटीचे कुलूप तोडून पेटीमधील सोन्याचे दागिने व नगदी रुपये चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे कॉ संदीप मोरे हे करत आहेत.

Web Title: Home burglary and theft of Rs 50,000 in Talkhed