शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाआधी १५ मिनिटे आरोग्य मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : सामान्य रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही स्वामी रामानंद तीर्थ ...

अंबाजोगाई : सामान्य रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे.

स्वाराती रुग्णालयात लसीकरण विभागाच्या वतीने लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ‘१५ मिनिटे आरोग्य मार्गदर्शन’ या उपक्रमाचा आरंभ अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते अ. र. पटेल, उपअधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत दहिरे, डॉ. अंकुशे, डॉ. राजेश कचरे, डॉ. रमेश इंगळे, डॉ. विश्वजित पवार, डॉ. अविनाश काशीद, अधिपरिाचरिका उषा भताने, दत्तात्रय अंबेकर, गोविंद खरटमोल, नागेश औताडे उपस्थित होते.

डॉ. सुक्रे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अपुरा कर्मचारी वर्ग व अपुरी यंत्रसामग्री असतानाही निकराने लढा दिला. मात्र, आता तिसऱ्या लाटेचा सामना करताना सर्व त्रुटी दूर करून अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. अधिष्ठाता म्हणून माझा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून, या काळात रुग्णालय व्यवस्थापनात अनेक बदल केले आहेत. अनेक नवीन कामे करता आली. आगामी काळातही या रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा सामान्य रुग्णांना उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी डॉ. अविनाश काशीद यांनी ‘नियमित योगा’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, दत्तात्रय अंबेकर यांची भाषणे झाली. स्वातंत्र्य संग्रामचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या कारकीर्दीस एक वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक संयोजक डॉ. प्रशांत दहिरे यांनी केले. संचालन डॉ. श्रीधर आघाव यांनी केले. डॉ. गणेश ताटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

280721\20210728_132030.jpg

अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात लसीकरण विभागाच्या वतीने १५ मिनिटात आरोग्य मार्गदर्शन या मोहिमेचा शुभारंभ अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला