शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनीवरील पिकांची सर्रास काढणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST

गेवराई : कोल्हेर शिवारातील गट नंबर ५४ व ८४ या वादग्रस्त जमिनीबाबात कलम १४५ crpc प्रमाणे कार्यवाही करून देखील ...

गेवराई : कोल्हेर शिवारातील गट नंबर ५४ व ८४ या वादग्रस्त जमिनीबाबात कलम १४५ crpc प्रमाणे कार्यवाही करून देखील व शासनाचा नियम पायदळी तुडवत या वाद्‌ग्रस्त जमिनीवरील उभा असलेल्या तब्बल २० एक्कर ऊसाची तोडणी चालूच आहे. ही तोड बंद करून शासनाचा नियम तोडणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षकाराने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

यावर आता कारवाई होती का नाही, याकडे सर्वसामान्य नागरिकाचे लक्ष लागले आहे.

कोल्हेर येथील गट नंबर ५४ व ८४ वरील वाद्‌ग्रस्त जमिन ही १८ डिसेंबर २०२० रोजी आदेश पारित करून शासनाने ताब्यात घेतली व संबंधित पक्षकाराना व अन्य व्यक्तीस तिथे जाण्यासाठी मज्जाव केला. असे असताना देखील काही लोक सदर आदेश तोडून येथे उभा असलेला तब्बल २० एक्कर ऊस तोडणी करून नेत आहेत. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे रितसर तक्रार करून १५ दिवस उलटून देखील झाले. याकडे महसूल विभाग व पोलिस दुर्लक्ष करत आहेत.

या प्रकरणी फक्त ४ जानेवारी २१ रोजी येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ऊस तोड बंद केली. मात्र पोलिस गेल्यानंतर पुन्हा ऊसतोड सुरूच ठेवुन ऊस घेवुन जात आहेत. यावर पोलिसांनी कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे यात नुकसान होत आहे. या प्रकरणी कोणी कारवाई करावी यासाठी महसूल व पोलिस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते. याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या वाद्‌ग्रस्त जमिन प्रकरणी पोलिसांनी आम्हाला अहवाल दिला होता. त्यानंतर आम्ही १४५ सी.आर.पी.सी प्रमाणे कारवाई केली आहे. आता पुढील प्रकरण हे पोलिसांचे असल्याचे येथील तहसिलदार सचिन खाडे यांनी सांगितले. पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड याच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.