शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दु:खाची काजळी विसरून जीवनात रंग भरण्यासाठी टाकतात गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:19 IST

अनिल भंडारी बीड : मनभेद, मतभेद विसरत रंगांची उधळण करीत होळीचा सण सर्वत्र आनंद आणि जल्लोषात साजरा केला जातो. ...

अनिल भंडारी

बीड : मनभेद, मतभेद विसरत रंगांची उधळण करीत होळीचा सण सर्वत्र आनंद आणि जल्लोषात साजरा केला जातो. मागील वर्षभरात ज्याच्या घरी दु:खद प्रसंग ओढवला त्या कुटुंबांना बोलावून दु:ख विसरून जीवनात रंग भरावेत म्हणून समाजाच्या वतीने गुलाल टाकून, मिठाई भरवून गोड करण्याची परंपरा येथील सिंधी पंजाबी समाजाने जपली आहे. यंदा कोरोनामुळे अडचणी असल्यातरी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत यंदाच्या धुलिवंदनाला साधेपणाने रंग भरले जाणार आहेत.

व्यापार, उद्याेगासाठी मागील ६०-६५ वर्षांपासून सिंधी पंजाबी समाज इथल्या मातीत मिसळला आहे. सर्वधर्मिय सण , उत्सवात सहभागी होणाऱ्या सिंधी- पंजाबी बांधवांनी आपल्या समाजाची परंपरादेखील जपली आहे. शहरात या समाजाची ५० ते ६० घरे असून लोकसंख्या ७०० च्या घरात आहे. येथील गुरूनानक दरबारात समाजाचे सर्व उपक्रम, जयंती, उत्सव तसेच इतर कार्यक्रम एकोप्याने पार पडतात.

वर्षभरात ज्यांच्या घरी दु:ख झाले, घरातील व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन किंवा सामुदायिक कार्यक्रमात बोलावून या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली जाते. नंतर त्या कुटुंबीयांवर गुलाल टाकून आनंदात सहभागी होण्यासाठी विनवणी केली जाते. त्यानंतर हे कुटुंब समाजातील सर्व प्रसंगात सहभागी होतात, असा रितीरिवाज आहे. बीडमध्ये २५ वर्षांपासून हा रिवाज पाळला जातो.

जीवनप्रवासात एकरूप होण्यासाठी

धुलिवंदनाच्या दिवशी सर्व समाज एकत्र येतो. ज्यांच्या घरी दु:ख झाले त्यांचे पाहुणे, बहिणी, जावई, मामा, नातेवाईक येतात. निवेदन केले जाते. त्यानंतर समाजाच्या वतीने गुलाल टाकून त्यांना जिलेबी अथवा गोड पदार्थ भरविला जातो. परमेश्वरी लीलेपुढे हतबल असलोतरी भावी जीवनप्रवासासाठी एकरूप व्हावे, दु:ख विसरून नव्या जोमाने कामाला लागावे म्हणून प्रत्येक जण रंग टाकतात. अशावेळी उपस्थित भावूक होतात. परंतूु, पुढे चालायचे तेही जीवनात आनंदाचे रंग भरायचे म्हणून समजूत घातली जाते.

--

यावर्षी कोरोनामुळे सामुदायिक कार्यक्रमाला मुरड घालत दु:खितांच्या घरी जाऊन गुलाल टाकून आनंदात सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणार आहोत. वर्षभरात बीड शहरातील आसनानी व टेकवाणी या दोन कुटुंबात दु:खद प्रसंग घडला, त्यांचे सांत्वन करून आनंदाचे रंग भरले जाणार आहेत. - डॉ. मदन जेसवाणी, अध्यक्ष सिंधी- पंजाबी समाज, बीड.