शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या वाढत्या शेतीमुळे अंबाजोगाईत वाढला बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:41 IST

अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय त्याला पर्याय राहिला नाही ही बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय त्याला पर्याय राहिला नाही ही बाब समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी लाडेवडगाव तर पाच दिवसांपूर्वी सोनहिवरा परिसरात बिबट्या दिसल्याची बाब समोर आली. वर्षभरापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा परिसरातही खुद्द वनाधिकाऱ्यांनी बिबट्या पाहिला होता. त्या बिबट्याचे छायाचित्रही घेण्यात आले. अंबाजोगाई, परळी, धारूर, आडस या परिसरात वनविभागाचे मोठे जंगल आहे. या जंगलात बिबट्या, तरस व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. निसर्गनिर्मित अन्नसाखळीमध्ये प्रत्येक जीव परस्परांवर अवलंबून असतो. मात्र, या अन्नसाखळीत बाधा येऊ लागल्याने जंगलातील प्राणी इतरत्र आसरा घेऊ लागले आहेत. जंगले राहिली तर अन्नसाखळी पूर्ववत सुरू राहिल व त्या प्राण्याचा त्रास गावांना उद्भवणार नाही. गेल्या आठवडयात दिसलेला बिबट्या फक्त इकडून तिकडे पळताना दिसला. त्याने कुठेही हल्ला केला नाही अथवा तो मानवी वस्तीकडे फिरकलाही नाही. रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते खाद्य. सध्या उसाच्या वाढत्या फडांमुळे रानडुक्करांची संख्या वाढली आहे. जंगलातली रानडुकरे उसाच्या फडात आली. आपल्या शिकारीच्या शोधात बिबट्याही उसाच्या फडाचा आश्रय घेऊ लागला आहे. त्यामुळे त्याचे दर्शन वारंवार होऊ लागले आहे.प्राणीगणनेत बिबट्यांची संख्या समोर येईलदरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वनविभागाच्या वतीने प्राणी गणना केली जाते. या गणनेत जंगलात कोणते प्राणी किती आहेत याची नोंद घेतली जाते. गेल्यावर्षी झालेल्या नोंदीत बिबट्या दिसला मात्र गणनेच्या वेळी तो इतर जिल्ह्याच्या हद्दीत गेल्यामुळे त्याची नोंद झाली नाही. यावर्षीच्या प्राणी गणनेत अशी नोंद पुन्हा होईल असेही वरवडे म्हणाले.

बिबट्याला घाबरू नका - वन विभागबिबट्या हा प्राणी सहसा मनुष्यावर हल्ला करीत नाही. त्याचा पाठलाग करू नका अथवा छेडू नका. उलट बिबट्याचा शेतकºयांना फायदाच होईल. हरीण, रानडुक्कर शेतींची नासधूस करणाºया प्राण्यांना आळा बसेल. जर बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याची नुकसानभरपाई शासनाच्या वतीने दिली जाते. मात्र, असा बिबट्या आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधल्यास त्याचा बंदोबस्त केला जातो, अशी माहिती वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवडे यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडleopardबिबट्याforest departmentवनविभागMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र