दोन दिवसांनी खुले होणार जिल्हा स्टेडियमचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:23+5:302021-01-16T04:37:23+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्हा स्टेडियम बंद केले होते. आता जवळपास सर्वच मैदाने खेळाडूंसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र ...

The grounds of the district stadium will open in two days | दोन दिवसांनी खुले होणार जिल्हा स्टेडियमचे मैदान

दोन दिवसांनी खुले होणार जिल्हा स्टेडियमचे मैदान

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्हा स्टेडियम बंद केले होते. आता जवळपास सर्वच मैदाने खेळाडूंसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बंदच आहे. त्यामुळे विविध प्रकारातील खेळाडूंना सराव करता येत नाही. गुरुवारी बीडमधील मिलन बॉइज फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन मैदान खुले करावे, अशी मागणी केली. त्यानुसार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी व क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वच खेळाडूंसाठी तातडीने मैदान खुले करावे, अशी सूचना केली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी येत्या दोन ते तीन दिवसात मैदान खुले होईल, असे सांगितले आहे. यावेळी क्लबचे पदाधिकारी सय्यद जफर, साजिद परवेज खान, वैभव मुसळे, अदनान सिद्दिकी, आदिल चाऊन्स, राहुल बायस, शेख शोएब, आमीर कादरी, अबेदभाई आदी उपस्थित होते.

Web Title: The grounds of the district stadium will open in two days