आलेख वाढताच; २४१ नवे रुग्ण तर दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:33 IST2021-07-29T04:33:22+5:302021-07-29T04:33:22+5:30

प्रशासनाकडून आवाहन केल्यानंतरही लोक काळजी घेत नसल्याचे समोर येत आहे. बुधवारी जिल्ह्यातील ५ हजार २ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात ...

As the graph grows; 241 new patients and two victims | आलेख वाढताच; २४१ नवे रुग्ण तर दोघांचा बळी

आलेख वाढताच; २४१ नवे रुग्ण तर दोघांचा बळी

प्रशासनाकडून आवाहन केल्यानंतरही लोक काळजी घेत नसल्याचे समोर येत आहे. बुधवारी जिल्ह्यातील ५ हजार २ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ४ हजार ७६८ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर २४१ पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई ५, आष्टी ४४, बीड ५०, धारुर १६, गेवराई २९, केज १०, माजलगाव ५, परळी १, पाटोदा ३३, शिरुर ३९, वडवणी ९ येथील रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ९६ हजार ७१२ एवढी झाली आहे. पैकी ९२ हजार ५७४ जण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत. साथरोग अधिकारी डाॅ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

Web Title: As the graph grows; 241 new patients and two victims