शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची करवसुली थकली; विकासकामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे मार्च महिन्यातच सलग दोन वर्षे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनामुळे मार्च महिन्यातच सलग दोन वर्षे लॉकडाऊन झाल्याने ग्रामपंचायतींची मागील वर्षाची थकबाकी मोठ्या प्रमाणात रखडली आहे. परिणामी वसुली थकल्याने विकासकामांना मोठा ब्रेक बसला आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांचे वेतनही वसुलीअभावी रखडले आहे.

अंबाजोगाई तालुक्यात एकूण ९९ ग्रामपंचायती आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार जवळपास ठप्प राहिले. याचा मोठा परिणाम म्हणून सर्वच ग्रामपंचायतींच्या विविध करांची थकबाकी वसुली करणे थांबले. प्रत्येकवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस ते मे महिन्यापर्यंत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करवसुली होते. गुढीपाडव्यानंतर शेतक-यांकडे रब्बी हंगामाचा पैसा उपलब्ध होतो व आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात होतात. मात्र गेल्या दोन वर्षांत यावर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच कोरोनाच्या आजाराने ग्रामस्थ धास्तावलेले होते. त्यानंतर लॉकडाऊन पडल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प राहिले. अशा स्थितीतही गावोगावच्या ग्रामपंचायतींनी स्वच्छतेवर मोठा खर्च केला. गावची स्वच्छता, फवारणी, धूर फवारणी व आरोग्यविषयक जनजागृती, लॉकडाऊनच्या कालावधीत ग्रामस्थांना संरक्षण अशा विविध बाबींवर ग्रामपंचायतींचा मोठा खर्च झाला. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित राहिल्या. ग्रामपंचायतींनी लॉकडाऊन असतानाही सर्व सोयी-सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्या.

....

कर वसुलीसाठी प्रयत्नशील

अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोणशीकर यांच्याकडे विचारणा केली असता, कोरोनाच्या कालावधीत वसुली थकली होती. अशाही स्थितीत नागरिकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गावचा गाडा हा गावातील करांवरच मोठ्या प्रमाणात चालतो. यासाठी कर वसुलीही झाली पाहिजे. त्या त्या गावातील ग्रामसेवक ग्रामस्थांकडून कर वसुलीसाठी प्रयत्नशील असल्याचे घोणशीकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.