शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वडवणीतील शासकीय कार्यालये तहानलेलीच

By admin | Updated: May 25, 2014 01:09 IST

राम लंगे , वडवणी यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली. मात्र अद्यापही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

राम लंगे , वडवणी यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली. मात्र अद्यापही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सध्या वडवणी शहरातील कुठल्याच शासकीय कार्यालयात कर्मचार्‍यांसह येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचार्‍यांना बाहेर जाऊन पाणी प्यावे लागत असले तरी अधिकार्‍यांनी मात्र स्वत:पुरती पाण्याची सोय केली आहे. अशा स्वार्थी अधिकार्‍यांबद्दल कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. येथील तहसील कार्यालय सोडता सर्वच शासकीय कार्यालये दुसर्‍याच्या जागेत आहेत. हक्काची जागा या कार्यालयांना अद्यापही मिळालेली नाही. एक तर हक्काची जागा नाही, त्यात आणखी या समस्यांचा सामना त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची कुठलीच उपाययोजना नसून अधिकारी, कर्मचारी शासनाच्या पैशाने स्वत:ची तहान भागवत आहेत. बाटलीबंद पाण्याशिवाय हे अधिकारी पाणी पित नसल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र या अधिकारी, कर्मचार्‍यांना तहसीलमध्ये विविध कामानिमित्त येणार्‍या सर्वसामान्य व्यक्तींची तहान भागविण्यासाठी उपाययोजना करण्यात यश आलेले नाही. स्वत: एसी रूममध्ये बसून सर्वसामान्यांना उन्हामध्ये उभे रहायला लावणार्‍या या अधिकारी, कर्मचार्‍यांवर मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय शहरापासून दूर असल्याने पिण्याचे विकत घ्यायचे म्हटले तरी मिळत नाही. येथील तहसीलमधील दलालांना अधिकारी, कर्मचारीच पाणी पिण्यासाठी देत असल्याचा आरोपही केला जात आहे. पंचायत समिती कार्यालय पंचायत समिती कार्यालयातही यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. पंचायत समिती कार्यालय हेसुद्धा किरायाच्या जागेतच चालते. येथेही सर्वसामान्य व्यक्तींच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यात यश आलेले नाही. येथे येणार्‍या सर्वसमान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील खाजगी हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहेत, तर काही जणांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तालुका कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, बसस्थानक, रजिस्टरी आॅफिस, सहायक निबंधक कार्यालय, बालविकास प्रकल्प कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य कार्यालय, महावितरण कार्यालय, पशुवैद्यकीय रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी कार्यालये वडवणी शहरात आहेत. मात्र कुठल्याच कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याबाबत गटविकास अधिकारी सी.एम.ढोकणे म्हणाले, तहानलेल्या नागरिकांना पाणी देणे कर्तव्य समजून त्याच्या पिण्याची व्यवस्था सर्व शासकीय कार्यालयात करणे आवश्यक आहे. त्यांच्य पिण्याच्या पाण्याची सोय करावी.तहसील कार्यालयात दलालांना होतेय अधिकार्‍यांकडून पिण्याच्या पाण्याची सोय. सर्वसामान्यांना मात्र घ्यावा लागतोय खाजगी हॉटेलचा आधार. कुठल्याच शासकीय कार्यालयात नाही पिण्याच्या पाण्याची सोय दलालांऐवजी सर्वसामान्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची होतेय मागणी महिलांचे होताहेत अधिक हाल. वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची होतेय मागणी.