वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करच दर्जा द्या; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 16:09 IST2021-05-24T16:09:34+5:302021-05-24T16:09:52+5:30

परळी विद्युत केंद्रातील 700 कर्मचारी, अभियंते, कामगार  या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

Give power workers the status of frontline workers only; Officers-employees wearing black ribbons | वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करच दर्जा द्या; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करच दर्जा द्या; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन

परळी: कोराना काळात फ्रंट वर येवून  काम करीत असलेले  तीन ही वीज  कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर चा  दर्जा द्यावा , विज कर्मचारी  व अधिकारी यांच्या कुटुंबांचे लसीकरण करावे या सह विविध मागण्यांसाठी  सोमवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात  व परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीज कर्मचारी, अधिकारी ,अभियंता व कंत्राटी कामगार यांनी काळ्या फित लावून  निषेध केला.

शहरातील वीज वितरण कार्यालयात इंटकचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी  हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्युत कर्मचारी ,अभियंता संयुक्त कृती समितीचे सुभाष मुंडे ,दिगंबर तपासे, कृष्णा शिंदे ,बळीराम गीते कांतिलाल मुंडे, ज्ञानोबा मुंडे ,मच्छिंद्र तारळकर ,सचिन सूर्यवंशी, डी आर मुंडे लक्ष्मण मुंडे, सुरेश देशमुख, प्रशांत खाडे, सुरेश खाडे आदी कर्मचारी उपस्थित होते. वीज ग्राहकांना वेठीस न धरता हे काम बंद आंदोलन चालू आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना केंद्रीय कार्याध्यक्ष देविदास देवकते यांनी दिली. परळी विद्युत केंद्रातील 700 कर्मचारी, अभियंते, कामगार  या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात ऊर्जामंत्री यांच्यासोबत बोलणे चालू आहे. त्यात तोडगा न निघाल्यास हे आंदोलन बेमुदत चालू राहणार आहे . 
-दत्तात्रय गुट्टे, परळी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक . 
 
या आहेत  मागण्या : 
- वीज कामगार, अभियंते व अधिकारी तसेच कंञाटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा द्याव्यात
- कुटूंबातील सदस्यांचे कोरोना लसीकरण करावे.
- कमावर असताना कोरोनाने मृत्यू पावलेल्यांना रु.५० लाख अनुदान दयावे.
-तिन्ही कंपन्याकरीता एम.डी.इंडिया या जुन्याच टिपीएची तात्काळ नेमणूक करावी.
- कोरोना उद्रेक पाहता वीज बिल वसुलीकरीता सक्ती करु नये.

Web Title: Give power workers the status of frontline workers only; Officers-employees wearing black ribbons