शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:03 IST

नमिता मुंदडा : अंबाजोगाईत रस्ते विकास महामंडळाची बैठक अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे ...

नमिता मुंदडा : अंबाजोगाईत रस्ते विकास महामंडळाची बैठक

अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. ते रोखण्यासाठी रखडलेले रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा,अशी सूचना आमदार नमिता मुंदडा यांनी केली.

अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार मुंदडा बोलत होत्या. या बैठकीस रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, एच. पी. एम. कंपनीचे संचालक अजय देशमुख, तांत्रिक सल्लागार रविकुमार, अभियंता निवृत्ती शिंदे, विकास देवळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत आमदार मुंदडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे विविध समस्यांवर लक्ष वेधले. या बैठकीत कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी पिंपळा ते मांजरसुंबा या रस्त्याच्या ८२ किलोमीटरपैकी ७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मुंदडा, वैजनाथ देशमुख, अ‍ॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे, अमोल जाधव, रमाकांत पाटील, अभिजीत जगताप, रमाकांत उडाणशिव यांची उपस्थिती होती.

काम सुरू होईपर्यंत खड्डे खोदू नका, जिथे पुलाचे काम सुरू आहे, तिथे डांबरी रस्त्याचे वळणमार्ग करा. भाटुंबा व कळमअंबा येते चार नळ्यांचे पूल बांधावेत. नेकनूर व केज येथील रस्त्यांचे रुंदीकरण, अंबाजोगाई शहरात लोखंडी सावरगाव ते यशवंतराव चव्हाण चौक रस्त्याच्या चौपदरीकरणास परवानगी, शहरातील भगवानबाबा चौक व यशवंतराव चव्हाण चौकाचे सुशोभिकरण करावे, जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत रस्ते खोदू नये अशा विविध सूचना उपस्थितांनी अधिकाऱ्यांना दिल्या.