शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे फूलविक्रेत्यांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे शहरातील फूल व्यवसाय डबघाईस आल्यामुळे फूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. फुलांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनामुळे शहरातील फूल व्यवसाय डबघाईस आल्यामुळे फूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. फुलांची विक्री सद्य:स्थितीत ठप्प झाल्यामुळे कुटुंबाचा घरखर्च कसा भागवावा? अशी व्यथा फूल विक्रेत्यांनी मांडली.

कोरोना महामारी अगोदर फूल व्यवसाय चांगला चालायचा. दिवसाकाठी ५०० ते ६०० रुपये पदरात पडायचे. परंतु दीड वर्षापासून १०० रुपयांची पण फूल विक्री होत नाही. ग्राहक मागतील त्या भावात फूल विक्री करावी लागत आहे. कोरोनाआधी फुलांना चांगली मागणी होती.विवाह कार्य, देवस्थाने बंद असल्यामुळे फूल व्यवसाय डबघाईस आला आहे. वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे परजिल्ह्यांतील फुले येईनाशी झाली आहेत. जिल्ह्यात व परिसरात जी उपलब्ध आहेत. तीच फुले विकत घेऊन घरसंसार भागवावा लागत आहे.

....

सद्य:स्थितीत जरबेरा ३० रुपये बंडल, गुलाब ६० रुपये किलो, गलांडा २० रुपये किलो, तर मोगरा १५० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. शहरामध्ये फुलांची दुकाने जवळपास २० ते २५ आहेत. पिढ्यान्‌पिढ्या हाच व्यवसाय करीत असल्यामुळे दुसरा व्यवसाय आता करणे कठीण आहे. बाजारपेठेत महिन्याकाठी एक क्विंटलपर्यंत फुलांची विक्री होते. यातून जवळपास महिन्याकाठी ४० हजारांची उलाढाल होते, असे फूल विक्रेत्यांनी सांगितले.

....

फूल विक्रीसाठी वेळ वाढवावी

फूल विक्रेत्यांची अडचण लक्षात घेऊन शासनाने त्यांना जास्तीची वेळ द्यावी, म्हणजे फूल व्यवसाय करता येईल. फूलविक्रेत्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. कोरोना महामारीमुळे ग्राहकही दुकानांवर येईनासे झाले आहेत. कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा? असा प्रश्न आहे.

-विलास फुलारी, फूलविक्रेता, अंबाजोगाई