शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या शोरूमला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर भागात असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या शोरूमला लागलेल्या आगीत ६ दुचाकीसह फर्निचरचे लाखो ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर भागात असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या शोरूमला लागलेल्या आगीत ६ दुचाकीसह फर्निचरचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याची संबंधितांनी सांगितले.

या आगीमध्ये दुचाकी दुरूस्ती करणारा तंत्रज्ञ जखमी झाला असून त्याच्यावर स्वा.रा.ति. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे आतील कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले व आग आटोक्यात आली.

अंबाजोगाई शहरातील भर वस्तीतील प्रशांतनगर भागात विराज जगदाळे यांचे जगदाळे इलेक्ट्रॉनिक मोटार्स सायकलचे शोरूम आहे. शुक्रवारी दुपारी एक दुचाकी मेकॅनिक मयूर व्यंकट शिंदे (वय १९ रा. होळ) हे दुरूस्त करीत असताना दुचाकीतील बॅटरीचा स्फोट झाल्याने इतर सहा दुचाकींनी पेट घेतला. इलेक्ट्रॉनिक दुचाकी असल्याने बॅटऱ्यांचा स्फोट झाल्याने शोरूमला पूर्ण आगीने वेढले. यातील कामगार जीव वाचवण्याच्या उद्देशाने बाहेर सैरावैरा पळू लागले.

आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले. या दलाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच शोरूममध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु यातील दुचाकी दुरूस्ती करणारा मयूर व्यंकट शिंदे हा आगीमध्ये भाजल्याने जखमी झाला. त्याला उपचारासाठी स्वा.रा.ति. रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

सदरील आगीचा प्रकार हा बॅटरीच्या स्फोटामुळे घडला असल्याचे निदर्शनास येत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.

020721\img-20210702-wa0137_14.jpg~020721\img-20210702-wa0107_14.jpg