दुष्काळी उपाययोजनांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:30 IST2018-11-19T00:29:53+5:302018-11-19T00:30:20+5:30
दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

दुष्काळी उपाययोजनांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.
दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई व गुरांच्या चाºयाचा प्रश्न यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परवा दोन दिवसापूर्वी शेतकºयांनी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून पिंपरगव्हाण येथील कोरड्या धरणामध्ये दोन दिवसांचे धरणे आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर तात्काळ सुरू केले, व उर्वरित मागण्या सरकारला कळवल्याचे अश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. दुसºया दिवशी राजुरी परिसरातील शेतकºयांनी मुर्शदपूर फाट्यावर एकत्र येऊन विविध मागण्यांसाठी रास्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता. यावेळी बोलताना राजेंद्र मस्के म्हणाले, आता शेतकºयांचा अंत सरकारने पाहू नये तात्काळ दुष्काळी उपाययोजना चालू कराव्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि गुरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तरीही सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही सरकारने जर असाच वेळकाढूपणा केला तर शेतकरी तुम्हाला शासकीय कार्यालयांमध्ये बसू देणार नाहीत, असा इशारा मस्के यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जयसिंग चुंगडे, युवा सेनेचे सागर बहिर, युवराज मस्के, बंडू मस्के, बद्रीनाथ जटाळ, दीपक बागलाने, शेळके, सचिन आगम, रोहित शेळके, रमेश उंद्रे, मनिष भोसकर, निलेश जगताप यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी होते.
दावणीला चारा द्या
दावणीला चारा, पिकविम्याचे पैसे त्वरित द्या, शेतकरी, शेतमजूराच्या हाताला काम द्या, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या, न. राजुरी ते खरवंडी रस्त्याचा मावेजा द्या, राजुरी सर्कलमधील रात्रीचे भारनियमन बंद करा या व इतर मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.