शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात कडक उन्हाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

... शिरूर-बीड रस्त्याची दुरवस्था शिरूर कासार : शिरूरपासून बीड अवघे चाळीस किलोमीटरवर आहे. चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांत बीडला पोहोचता ...

...

शिरूर-बीड रस्त्याची दुरवस्था

शिरूर कासार : शिरूरपासून बीड अवघे चाळीस किलोमीटरवर आहे. चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांत बीडला पोहोचता येते. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था बनली आहे. हे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड-पावणेदोन तासांचा कालावधी लागतो. यामुळे डिझेल, पेट्रोल खर्चात देखील वाढ होते. शिवाय कधी गाडी स्लिप होईल व अपघात घडेल याची शाश्वती देता येत नाही. तरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

....

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळबाग लागवड करावी

शिरूर कासार : पारंपरिक शेती आता फारशी परवडत नसल्याने शेतकऱ्यांना फळबागा हा चांगला पर्याय आहे. शिवाय त्यात आंतरपिके सुध्दा घेता येतात. दीर्घकाळ उत्पन्न म्हणून फळबागा एक चांगला पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे आपले लक्ष केंद्रित करावे. तालुका कृषी कार्यालय यासाठी मार्गदर्शन करेल, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून केले आहे.

...

झाडाखाली निंबोळीचा सडा

शिरूर कासार : बहुगुणी म्हणून कडू लिंबाच्या झाडाकडे पाहिले जाते. या झाडाचे लाकूड जसे कामाला येते, तसा त्याचा हिरवा पाला देखील विविध रोग निवारणासाठी वापरला जातो. निंबोळी अर्क तर शेतीपिकासाठी संजीवनी ठरत आहे. सध्या कडू लिंबाच्या झाडाखाली पिकलेल्या पिवळ्या व रसभरीत निंबोळ्यांचा सडा पडलेला दिसून येत आहे. त्या गोळा करून त्याचा अर्क तयार करून वापरल्यास औषधींच्या खर्चात बचत होईल, असा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत.

....

दिव्या घाटाच्या दर्शनाला वारकरी पारखा

शिरूर कासार : माऊली पालखी सोहळ्यात पायी सहभागी होऊन सोमवारी हा सोहळा पुण्यावरून सासवडला जातो. वाटेत दिव्या घाटाचे विलोभनीय दर्शन घडत असते. मात्र यंदाही कोरोनामुळे वारकरी दिव्या घाटाच्या दिव्य दर्शनाला पारखा झाला असून जागेवरच त्या आठवणींना उजाळा देत समाधान मानत आहे.

...