शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उघडी रोहित्रे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी वडवणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बिनव्याजी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, अशी मागणी ...

बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी

वडवणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बिनव्याजी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये तत्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणीही होत आहे.

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

वडवणी : शहरातील बाजारतळावर उभारलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याने उघड्यावर व्यावसायिक व्यापारी कामगार नागरिकांना लघुशंका करावी लागत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तत्काळ शौचालयाची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

हातपंपाचे पाणी आटल्याने भटकंती

शिरुर कासार : यावर्षी उशिरा का होईना उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील हातपंपाची पाणी पातळी आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. नळ योजना नसलेल्या भागात नागरिकांना केवळ हातपंपाचा आधार आहे. परंतु हातपंप आटल्याने पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कमी-जास्त प्रवाहाने वीजपुरवठा

धारुर : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित व कधी कमी तर कधी जास्त दाबामुळे वीजपुरवठा होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही पिकांना पाणी देताना विजेची वाट पाहावी लागते. सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी होत आहे.