शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वीज २७ मिनिटे गायब; ऑक्सिजन लावलेले रुग्ण घाबरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

बीड : जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमधील वीज तब्बल २७ मिनिटे गायब झाली होती. त्यामुळे ऑक्सिजन लावलेले रुग्ण घाबरले होते. ...

बीड : जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमधील वीज तब्बल २७ मिनिटे गायब झाली होती. त्यामुळे ऑक्सिजन लावलेले रुग्ण घाबरले होते. हा प्रकार सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. यामुळे लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेले जनरेटर गेले कुठे, असा सवाल उपस्थित होत असून यानिमित्ताने पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाचा आणखी एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे बाजूच्याच नर्सिंग हाॅस्टेलमध्ये २०० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात आली. याच इमारतीत सोमवारी रात्री दुसऱ्या मजल्यावरील वीज गायब झाली होती. याच वाॅर्डमध्ये १० रुग्ण ऑक्सिजनवर होते. यातील तिघांना तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आला, तर सात जणांचा ऑक्सिजन बंद पडला होता. रुग्णांनी आरडाओरड करण्यासह काही सुजाण नागरिकांनी ही माहिती सोशल मीडियावर टाकली. त्यानंतर हा प्रकार जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना समजला. त्यांनी तात्काळ दखल घेतली. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. नोडल ऑफिसर डॉ. महेश माने यांनाही याची कल्पना देताच त्यांनी वॉर्डमध्ये धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली. काही वेळासाठी वीज गेल्याचे त्यांनीही मान्य केले.

दरम्यान, कोरोनाच्या नावाखाली आराेग्य विभागाने लाखो रुपये खर्च करून जनरेटर खरेदी केलेले आहेत. अर्धा तास वीज गायब होऊनही आपत्कालीन स्थितीत जनरेटर नसणे ही खूप गंभीर बाब आहे. हाच प्रकार आयसीयु अथवा इतर वॉर्डमध्ये घडला असता, तर जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत असून याची चौकशी करून यापुढे असा प्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.