शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पाऊस होऊनही पाण्याचा निचरा, सोयाबीनला झाला फायदा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

केज : तालुक्यातील पळसखेड येथील शेतकरी प्रशांत ईखे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी केली. ...

केज : तालुक्यातील पळसखेड येथील शेतकरी प्रशांत ईखे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी केली. यामुळे मागच्या आठवड्यात संततधार पाऊस होऊनही वरंब्यावर लागवड केल्यामुळे सोयाबीनच्या पिकात पाणी थांबले नाही. रानातील पाणी बाजूला असलेल्या सऱ्यांतून वाहून गेले. सोयाबीन वाफशावर राहून झाडे तजेलदार दिसून येत आहेत. मागील वर्षी याच रानात पाणी थांबले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले होते. परंतु या वर्षी बीबीएफ पद्धतीने पेरणीचा फायदा झाल्याचे सांगत मोहन ईखे यांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षक अनिकेत पोटभरे यांनी हवामान आधारित पीक सल्ला माहितीपत्रके वाटप केली. शेतीशाळेला लहू मुळे, मारुती गायकवाड, अविनाश चव्हाण, कल्याण गायकवाड, रावण गायकवाड, किशोर गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, प्रतीक गायकवाड, कमलेश गायकवाड, सोपान पौळ, महादेव गायकवाड, बन्सी गायकवाड, दिलीप मुळे, ऋषीकेश चव्हाण, बाळासाहेब चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.

पिकांचे निरीक्षण

रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचे फायदे इतर शेतकऱ्यांनी समजून घेण्यासाठी उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतीशाळा वर्गाच्या प्रक्षेत्रावर शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना निरीक्षणे दाखवली असता शेतकऱ्यांनी पारंपरिक पेरणीचे सोयाबीन पिवळे पडले, पाणी साठून राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे सांगितले. येळकर यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा फायदा विस्तृतपणे समजावून सांगितला.

अनुदाासाठी अर्ज करावे

किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करणे व कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले तसेच बीजोत्पादन व बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अनुदान मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले.

210721\20211439-img-20210721-wa0005.jpg

पळसखेड येथे हवामान अनुकूल शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उप विभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांच्या सह शेतकरी.