शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा उपयोग घेता ना, मग आरक्षणावर बोला - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

गेवराई : माझ्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती केली. समाजाला ...

गेवराई : माझ्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती केली. समाजाला वेठीस धरू नका. तरीही, काहीच फरक पडला नाही. हे लोक स्पष्ट भूमिका मांडतच नाहीत. सर्वच पक्षाचे नेते मराठा समाजाला फसवायला लागलेत, असा गंभीर आरोप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी येथे केला आहे.

सत्तेचा उपयोग घेता ना, मग आरक्षणावर बोला ना, कोणाला घाबरता? समाजाचे काही देणे लागता की नाही? नसता काळ माफ करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत खा. संभाजीराजे यांनी, मी कुठेही असलो समाजासाठी अहोरात्र तयार आहे. समाजाचा पाईक म्हणून सेवा करीत राहीन, असेही त्यांनी जाहीर केले. शनिवारी गेवराईच्या जनसंवाद दौऱ्यात संभाजीराजे म्हणाले, माझ्या समाजाच्या मागण्यांसाठी आणि प्रश्नांसाठी मला पक्ष स्थापन करण्याची गरज नाही. त्यासाठी मला राजकीय पदाचीही गरज नाही. मी शिपाई होऊन तुमच्यासोबत रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना निर्णय घ्यायला लावू. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम बहुजन समाजातील विविध घटकाला इ.स. १९०२ मध्ये आरक्षण दिले. वंचित घटकांना आरक्षण देऊन त्यांना बराेबरीत आणण्याचा तो प्रयत्न होता. आज सत्तर टक्के मराठा समाज हा गरीब आहे. म्हणून आरक्षणाची नितांत गरज आहे. परंतु, मराठा समाजाला आरक्षण अशा स्थितीतही का दिले जात नाही? सत्तेचा उपभोग घेताय, मग आरक्षण देण्याबाबतची भूमिका का घेत नाहीत? असा संतप्त सवाल करततुम्ही भूमिका घेत नाहीत. म्हणून आरक्षणाबाबत आपण पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे. मुके होऊ नका, आता तरी बोला, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. आमच्या १७ मागण्या असताना त्यातील पाच-सहा मागण्या तरी पूर्ण करा. मागासवर्गीय आयोगाने परत एकदा सामाजिक मागास कसे आहोत, हे सांगावे, काही चुका दुरुस्त कराव्या लागतील. राज्यपाल, राष्ट्रपती, केंद्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रपतींना वाटले तरच संसदेत आरक्षणावर चर्चा, राज्याच्या हातात काही नाही. त्यामुळे, केंद्राने वटहुकूम काढावा. त्याशिवाय पर्याय नाही.

040721\5220sakharam shinde_img-20210703-wa0027_14.jpg