धनंजय मुंडेंची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; तिन्ही बहिणींनी लाडक्या भावाला बांधली राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 22:30 IST2023-08-30T22:29:33+5:302023-08-30T22:30:17+5:30

अनेक वर्षांनंतर मुंडे कुटुंबाने एकत्रित राखी पौर्णिमेचा सण साजरा केला.

Dhananjay Munde's Rakhi Purnima; All the three sisters tied the rakhi | धनंजय मुंडेंची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; तिन्ही बहिणींनी लाडक्या भावाला बांधली राखी

धनंजय मुंडेंची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; तिन्ही बहिणींनी लाडक्या भावाला बांधली राखी

मुंबई/परळी-आज राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येतजण आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहे. राखी पौर्णिमेला मुंडे घराण्यातील बहिण-भावाची चर्चा होत असते. राजकारणात एकमेकांचे वैरी असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळतात. 

यंदाच्या राखी पौर्णिमेलाही मुंडे भाऊ-बहिण एकत्र पाहायला मिळाले. पण, यावेळची राखी पौर्णिमा मुंडेंसाठी खास राहिली. कारण, यंदा धनंजय मुंडे यांच्या तिन्ही बहिणींनी त्यांना राखी बांधली. मुबंईत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली. या निमित्ताने 2009 नंतर प्रथमच कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमेचा साजरा केला. यावेळी प्रज्ञा मुंडेदेखील उपस्थित होत्या.

Web Title: Dhananjay Munde's Rakhi Purnima; All the three sisters tied the rakhi