रातरानी बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:24+5:302021-07-07T04:41:24+5:30

.... रस्ता रुंदीकरणाची मागणी आष्टी : बीड-अहमदनगर रस्त्याचे गेल्या तीस वर्षात रुंदीकरण झालेले नाही. या रस्त्यावरून सध्या वाहनांची रहदारी ...

Demand to start the bus at night | रातरानी बस सुरू करण्याची मागणी

रातरानी बस सुरू करण्याची मागणी

....

रस्ता रुंदीकरणाची मागणी

आष्टी : बीड-अहमदनगर रस्त्याचे गेल्या तीस वर्षात रुंदीकरण झालेले नाही. या रस्त्यावरून सध्या वाहनांची रहदारी वाढली आहे. रस्ता अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, तरी हा रस्ता चार पदरी करावा, अशी मागणी होत आहे.

---

गर्दी वाढली; काळजी घ्या

कडा : आष्टी तालुक्यातील कडा बाजारपेठेत रोज गर्दी वाढत आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करावा. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

....

धानोरा तलावातील पाणीपातळीत घट

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा येथील कांबळी प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे. जुलै महिना उलटला, तरी अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणात नवीन पाणी आले नाही. सध्याच्या पाणीसाठा घटला असल्याने, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

...

पीककर्ज जलदगतीने वाटप करा

कडा : कडा परिसरातील बॅंकांमध्ये सध्या शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप सुरू आहे. यासाठी शेतकरी बँकेत गर्दी करीत आहेत, तरी कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

....

Web Title: Demand to start the bus at night