शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

देवळा येथील रंगीत टरबुजाला विदेशात मागणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : वरून हिरवे तर आतून पिवळे असणारे रंगीत टरबूज ‘आरोही’चे देवळा (ता.अंबाजोगाई) येथे उत्पादन झाले आहे. ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : वरून हिरवे तर आतून पिवळे असणारे रंगीत टरबूज ‘आरोही’चे देवळा (ता.अंबाजोगाई) येथे उत्पादन झाले आहे. या रंगीत टरबुजाला परदेशातून मागणी होत आहे. ही किमया युवक शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी साधली. या प्रयोगातून त्यांनी दोन महिन्यांत केवळ ३० गुंठे जमिनीत दीड लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

जे विकेल ते पिकेल, या धर्तीवर शेतीत नवीन उत्पादन घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो.

देवळा येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र भानुदासराव देवरवाडे यांनी नोन यु सिड्स अरोही आणि विशाला अशा दोन प्रजातीच्या रंगीत टरबुजाचे उत्पादन घेतले. हे टरबूज वरून हिरवे आणि आतून पिवळे तर वरून पिवळे आणि आतून लाल अशा रंगाचे आहे. ३० गुंठे जमिनीत पाच हजार रोपांची लागवड २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पहिली तोड २३ जानेवारीला झाली. अवघ्या दोन महिन्यांत साधारण ४ किलो ते ५ किलो वजनाचे फळ झाले आहे. लागवड हिवाळ्यातील असून बदलत्या हवामानाचा कसलाही फरक पडला नाही. आपल्या महाराष्ट्रातही उत्तम रंगीत टरबूज येऊ शकते, हे या प्रयोगातून शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी योग्य नियोजनातून सिद्ध केले. अशा प्रयोगामुळे शेतकऱ्यांना नवनवीन वाण हे बाजारपेठेत मागणी असणारे व उत्तम नफा मिळवून देणारे पीक आहे. रिलायन्स मॉल मुंबई यांनी जागेवर येऊन या टरबुजाची खरेदी केली आहे. हे टरबूज तैवान देशात लोकप्रिय असून याला मोठ्या शहरातही मागणी आहे. देवरवाडे यांनी शेती आधुनिक व तंत्रज्ञानाची जोड देऊन केल्यास निश्चित यश व मोबदला मिळतो. याची प्रचीती नव्या पिढीसमोर ठेवली आहे.