शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खजाना विहिरीजवळ बसथांब्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

अवैधरीत्या दारू विक्री; कारवाईची मागणी वडवणी : काही दिवसांपूर्वी बंद झालेली अवैधरीत्या दारू विक्री परिसरात जोमाने सुरू असल्याचे दिसून ...

अवैधरीत्या दारू विक्री; कारवाईची मागणी

वडवणी : काही दिवसांपूर्वी बंद झालेली अवैधरीत्या दारू विक्री परिसरात जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गुटखा विक्री तेजीत; कारवाई होईना

पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील टपऱ्या, दुकानांवर सर्रास गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई करणे गरजेचे आहे. मागील शहरासह तालुक्यात कारवाई झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छतेची मागणी

वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत; परंतु या दुभाजका शेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या बाजूंची स्वच्छतेची मागणी नागरिकांतून होत आहे.

खड्डे बुजवावेत

बीड : तालुक्यातील चौसाळा गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांमधून खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार होत आहे; मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी होत आहे. वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

वाहनचालकांकडून नियमांची अवहेलना

केज : शहर व परिसरात वाहन चालकांकडून सातत्याने नियमांची अवहेलना सुरू आहे. दुचाकी वाहने व अ‍ॅाटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पाहायला मिळते. शहरात तर मुख्य रस्त्यावर अनेक रिक्षांची बिनधास्त पार्किंग असते. सर्रास रस्त्यावर वाहने लावली जातात.

मोबाइलचा अतिवापर

वडवणी : ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. पालकांची इच्छा नसतानाही अभ्यासासाठी मुलांना मोबाइल द्यावा लागत आहे; मात्र डोळ्याचे व कानाचे आजार वाढत असून, एकलकोंडेपणा वाढत आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.