जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार २३७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १९६ पॉझिटिव्ह, तर ५ हजार ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ८, आष्टी ४६, बीड ४५, धारुर ८, गेवराई २७, केज १०, माजलगाव ८, परळी २, पाटोदा २१, शिरुर १२ आणि वडवणी तालुक्यातील ९ जणांचा समावेश आहे. तसेच मागील २४ तासांत एका मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात कासेवाडी (ता. आष्टी) येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण मृत्यूचा आकडा २ हजार ५६५ झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ९४ हजार १३३ इतकी झाली असून, यापैकी ९० हजार २९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ हजार २७१ रुग्ण उपचार घेत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}