‘जैविक’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST2021-03-09T04:36:21+5:302021-03-09T04:36:21+5:30

इंटरनेट सेवा विस्कळीत बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत ...

Danger of ‘biological’ | ‘जैविक’चा धोका

‘जैविक’चा धोका

इंटरनेट सेवा विस्कळीत

बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

बस सुरू करा

अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अ‍ॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.

श्वानांचा बंदोबस्त करा

बीड : शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे नागरिक जखमी झाले आहेत. बंदोबस्ताची मागणी आहे.

रस्ता दुरुस्ती करा

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.

Web Title: Danger of ‘biological’