शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून बांधला पावणेचार लाखांचा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील शेकटा येथे गावातील तरुण वर्ग व शासकीय नोकरदार, व्यावसायिक व ग्रामस्थांच्यावतीने शेकटा येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : तालुक्यातील शेकटा येथे गावातील तरुण वर्ग व शासकीय नोकरदार, व्यावसायिक व ग्रामस्थांच्यावतीने शेकटा येथील फिरंगाई डोंगर परिसरातील खाणीवर लोकसहभागातून पावणेचार लाख रुपये किमतीचा लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. रविवारी संत-महंत व मान्यवरांच्याहस्ते बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन करण्यात आले.

सद्यस्थितीमध्ये संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली असताना, शेकटा येथील वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने लाॅकडाऊनमध्ये फिरंगाई मंदिर परिसरातील खाणीवर वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम लोकसहभागातून जमा करण्यात आली. यामध्ये गावातील नोकरदार, बाहेरगावी खासगी काम करणारे हात व गावातील शेतमजूर, कामगार या सर्वांनी मोलाचा दगड उचलत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. भूमिपूत्र असणाऱ्या संत-महंतांनी देखील या कामासाठी मोलाचे सहकार्य केले. प्रत्यक्ष काम पूर्णपणे जबाबदारीने पूर्ण करून घेण्यासाठी संपूर्ण वसुंधरा टीम मोठ्या जिद्दीने लढली.

रविवारी बंधाऱ्याचे जलपूजनप्रसंगी मच्छिंद्रगडाचे महंत जनार्धन महाराज, माऊली संस्थानचे नामदेव महाराज, चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख उपस्थित होते.

...

प्रतिष्ठानला मदतीचा हात

लोकवर्गणीतून झालेल्या बंधाऱ्याच्या कामाची व्याप्ती व महत्त्व लक्षात घेऊन जनार्धन महाराज, नामदेव महाराज, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी देखील वसुंधरा प्रतिष्ठानला मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचे दर्शन घडविले. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाणार आहे. यामुळे परिसरात पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.