शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा अपहार दडविला

By admin | Updated: May 29, 2014 00:39 IST

संजय तिपाले , बीड ग्रामपंचायतीला आलेल्या लाखोंंच्या विकास निधीवर डल्ला मारल्याचा ठपका असलेल्या ग्रामसेवकास जिल्हा परिषदेने चक्क पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़

 संजय तिपाले , बीड ग्रामपंचायतीला आलेल्या लाखोंंच्या विकास निधीवर डल्ला मारल्याचा ठपका असलेल्या ग्रामसेवकास जिल्हा परिषदेने चक्क पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़ वडवणी येथील गटविकास अधिकार्‍यांनी या अपहार प्रकरणाची चौकशी केली; परंतु सीईओ या ग्रामसेवकावर इतके मेहेरबान झाले की त्यांनी चौकशी अहवाल बाजूला ठेवून ग्रामसेवकाची पाठराखण केली. वडवणी येथील ग्रामपंचायतीत व्ही़ आऱ डोंगरे हे दोन वर्षांपूर्वी ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते़ ४ सप्टेंबर २०१३ रोजी वडवणी ग्रा़प़ं ची तपासणी पंचायत समितीमार्फ त करण्यात आली़ या तपासणीत तब्बल १७ लाख ७० हजार ११६ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले़ या अपहार प्रकरणी ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांच्यावर गटविकास अधिकारी सी़ एम़ ढोकणे यांनी ठपका ठेवला़ त्यानंतर वडवणी येथील रहिवासी चक्रधर दत्तात्रय कु रकुटे यांनी अंगणवाडी शौचालय बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या खात्यावर पंचायत समितीकडून जमा झालेले ६४ हजार रुपये ग्रामसेवक डोंगरे यांनी परस्पर उचलल्याची लेखी तक्रार केली होती़ त्याचीही स्वतंत्र चौकशी करण्यात आली़ त्यातही डोंगरे दोषी आढळले़ त्यामुळे त्यांच्याकडून एकूण १८ लाख ३४ हजार ११६ रुपये इतकी अपहार रक्कम वसूल करुन गुन्हा नोंद करावा तसेच त्यांना निलंबित करण्याची शिफारस गटविकास अधिकारी सी़ एम़ ढोकणे यांनी केली होती़ मात्र, सीईओ राजीव जवळेकर यांनी ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांची पाठराखण करत गटविकास अधिकारी ढोकणे यांनी दिलेल्या चौकशी अहवालाला केराची टोपली दाखवली़ डोंगरे यांना वाचविण्यामागे जवळेकरांचा काय ‘इंटरेस्ट’ आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ याबाबत सीईओ राजीव जवळेकर यांच्याशी संपर्क झाला नाही़ शौचालय कामातही घोटाळा अंगणवाडी शौचालयासाठी वडवणी पंचायत समितीकडून ६४ हजार रुपयांचा निधी वडवणी ग्रा़पं़ला मिळाला होता़ आठ अंगणवाड्यांमध्ये शौचालय बांधण्यासाठी एकूण ६४ हजार रुपये आले होते़ ही रक्कम ग्रा़पं़ च्या खात्यातून ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांनी परस्पर उचलली असे गटविकास अधिकार्‍यांच्या अहवालात म्हटले आहे़ ‘एफआयआर’चीही होती शिफारस ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करुन त्यांना सेवेतून निलंबन करावे, अशी शिफारसही चौकशी अहवालात केलेली आहे़ २ मे २०१४ रोजी हा अहवाल गटविकास अधिकारी सी़ एम़ ढोकणे यांनी सीईओ राजीव जवळेकर यांना पाठविला़ याउपरही जवळेकरांनी डोंगरेंवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. कारवाईचा प्रस्ताव नव्याने पंचायत विभाग कोणालाही पाठीशी घालणार नाही़ डोंगरेंची संचिका कारवाईसाठी सीईओ यांच्याकडे पाठविली होती. आता संचिका ‘रिओपन’ केली आहे़ कारवाईचा प्रस्ताव नव्याने ठेवला असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ बीडीओंनी दिला दुजोरा वडवणीचे गटविकास अधिकारी सी.एम. ढोकणे यांनी सांगितले की, विकास निधीत १८ लाखाहून अधिक अपहार झाला आहे. चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला होता. परंतु ग्रामसेवकावर अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा असलेले ११ लाख ४ हजार ११६, अंगणवाडी बांधकाम २ लाख ७० हजार रुपये, दलित वस्ती सुधार योजनेचे ३ लाख ९६ हजार असे एकूण १७ लाख ७० हजार ११६ रुपयांचा अपहार करण्यात आला़ ही रक्कम ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांच्याकडून वसूल करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद (शिस्त व अपिल) नियम १९६४ चे कलम (४) प्रमाणे कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस चौकशी अहवालात केली होती़ असा केला अपहार तेरावा वित्त आयोग, दलित वस्ती विकास योजना, मानव विकास अंगणवाडी बांधकाम, तांडा वस्ती सुधार योजनेतून वडवणी ग्रामपंचायतीला लाखोंचा निधी आला होता़ या निधीची नोंद ग्रा़पं़च्या रोकड वहीत न घेता परस्पर उचलून अपहार केला़