दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST2021-06-16T04:45:42+5:302021-06-16T04:45:42+5:30

..... कृषी सेवा केंद्रे झाली मोकळी शिरूर कासार : रोहिणी, मृगाच्या थोड्याशा पावसावर शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी ...

Crisis of double sowing | दुबार पेरणीचे संकट

दुबार पेरणीचे संकट

.....

कृषी सेवा केंद्रे झाली मोकळी

शिरूर कासार : रोहिणी, मृगाच्या थोड्याशा पावसावर शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी केली. खरेदीसाठी उडत असलेली झुंबड पाहता काहींनी गैरफायदा घेत बियाणे, खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली. आता पुन्हा पाऊस लांबल्याने कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत. पाऊस लांबल्याने शेतकरीही संकटात सापडला आहे.

...

शुभमंगल सुरू झाले

शिरूर कासार : कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने मंगल कार्यालये बंद होती. शिवाय जाचक निर्बंध असल्याने लग्नाला ब्रेक लागला होता. मात्र, आता लाॅकडाऊन शिथिल झाले आहे. लग्नासाठी संख्येबाबत काही अंशी शिथिलता मिळाली असल्याने प्रमाणाबाहेर गर्दी न करता लग्न समारंभास सुरुवात झाल्याचे दिसू लागले आहे.

...

हातपंप ठरतोय आधार

शिरूर कासार : शहरात पाणीपुरवठा वेळापत्रकात सातत्य राहत नसल्याने पाणीटंचाईसाठी येथील नगरपंचायतपुढील हातपंपच आधार देत असल्याचे चित्र आहे. रोजच्या देवपूजेसाठी याच हातपंपाचे पाणी नेले जात असल्याचे दिसून येत येत आहे.

....

कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच

शिरूर कासार : तालुक्यात कोरोनाबाबत अद्यापही चढ-उतार सुरूच आहे. रविवारी अवघे आठ रुग्ण निघाले होते. यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी तब्बल वीस कोरोनाबाधित निघाले. मात्र, पुन्हा मंगळवारी आकडा आठवर आला असला तरी कोरोनाची भीती अजूनही कायम आहे.

.....

दोन जागी भरतो भाजीबाजार

शिरूर कासार : तालुक्यात सर्वांत मोठा समजला जात असलेला शिरूरचा एका जागेवर भरणारा बाजार कोरोनामुळे बंद पडला. एका जागेवर गर्दी नको म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी भाजी विक्रेते बसू लागले. अजूनही बाजाराला परवानगी नसल्याने शहरात जुने बाजारतळ आणि आता जिजामाता चौकात भाजी विक्रेते बसत आहेत. दोन्ही जागावर सकाळी मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Crisis of double sowing