शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत शुक्रवारी कोरोना रुग्णांची शंभरी पार; चार दिवसांत आढळले ३५१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:38 IST

corona virus in Beed सध्या लॉकडाऊन झाले असले तरी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचा अवलंब करून सुरक्षितता बाळगण्याकडे मोठा भर द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची ही वाढती संख्या अंबाजोगाई तालुक्यातील रहिवाशांसाठी चिंताजनक ठरू लागली आहे.

अंबाजोगाई    - अंबाजोगाई तालुक्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्याचा कोरोना रुग्णांचा आकडा शंभर पार झाला. गेल्या चार दिवसांत कोरोनाचे नवीन ३५१ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात निघाले आहेत. गेल्या आठ महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील हा आकडा सर्वोच्च ठरला. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अंबाजोगाई तालुक्यात जुलै महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली. पहिला रुग्ण जुलै महिन्यात निष्पन्न झाला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढतच राहिला. गेल्या आठ महिन्यात अंबाजोगाई तालुक्यात ३५०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित निघाले. या मार्च महिन्यात तर कोरोनाच्या रुग्णांनी अंबाजोगाई तालुक्यात उच्चांक गाठला. या महिन्यातीलच रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहचते की काय? अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांत कोरोनाचे ३५१ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर आज शुक्रवारी  आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा म्हणजे कोरोना रुग्णांनी अंबाजोगाई तालुक्यात शंभरी गाठली आहे.

कोरोना रुग्णांची ही वाढती संख्या अंबाजोगाई तालुक्यातील रहिवाशांसाठी चिंताजनक ठरू लागली आहे. सध्या लॉकडाऊन झाले असले तरी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचा अवलंब करून सुरक्षितता बाळगण्याकडे मोठा भर द्यावा लागणार आहे. तरच या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसेल. अन्यथा नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन न केल्यास पुन्हा कोरोनाचा आकडा वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड