शहरातील प्रभाग क्र. ५ मधील ४० फुटी रस्ता काम सुरू करावा, या मागणीसाठी नगरपरिषद कार्यालयसमोर नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरू, नपच्या सभापतिंसह अनेकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:22 AM2021-06-23T04:22:49+5:302021-06-23T04:22:49+5:30

दरम्यान उपोषणास प्रा. टी. पी. मुंडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी भेट ...

City ward no. Indefinite hunger strike of citizens in front of Municipal Council office for demand to start work on 40 feet road in 5, participation of many including NAP chairpersons | शहरातील प्रभाग क्र. ५ मधील ४० फुटी रस्ता काम सुरू करावा, या मागणीसाठी नगरपरिषद कार्यालयसमोर नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरू, नपच्या सभापतिंसह अनेकांचा सहभाग

शहरातील प्रभाग क्र. ५ मधील ४० फुटी रस्ता काम सुरू करावा, या मागणीसाठी नगरपरिषद कार्यालयसमोर नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरू, नपच्या सभापतिंसह अनेकांचा सहभाग

Next

दरम्यान उपोषणास प्रा. टी. पी. मुंडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी भेट देऊन मागणीस पाठिंबा दर्शविला आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या नगरपालिकेच्या कारभारावर प्रा. टी. पी. मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच वंचित आघाडी, एमआयएम, शिवसेना, संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनीही उपोषणास भेट दिली आहे. ४० फूट रस्ता प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे. सदरील रस्त्याचा प्रश्न परिसरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा असून ४० फूट रस्ता मुख्य रस्त्याला जोडण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी दहा वर्षांपासून परळी नगरपरिषदेला वेळोवेळी निवेदन देऊन, आंदोलन करून संबंधित नागरी समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.

गंगासागर नगर, कृष्णानगर ,सिद्धेश्वर नगरमधील नागरिकांसाठी बंद असलेला ४० फूट रस्ता अनंत अडचणींना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ४० फूट रस्ता खुला करण्यासंदर्भात आजपर्यंत न. प. प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेले आश्वासन पोकळ ठरले. यावर कायमचा तोडगा निघावा यासाठी २२ जून रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे

आठ दिवसांपूर्वी उपोषण करण्याचा इशारा नप अधिकाऱ्यांची भेट घेऊन या भागातील नागरिकांनी दिला होता. उपोषणात नगरसेवक सभापती गोपाळ आंधळे, मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, वैजनाथ कळसकर, गणेश खाडे, दीपक शिंदे, संतोष चौधरी, कमल नाईकवाडे, रितेश टाक, राजाभाऊ जाधव, राधाकृष्ण टेहरे, जगन्नाथ वडुळकर, दिलीप बुरांडे, वैजनाथ यादव, सुधाकर काळे, श्याम व्यवहारे नवनाथ आघाव, वाल्मिक आरसुळे, परशुराम मेंगले आदी उपस्थित होते.

मंगळवारपासून नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे. प्राध्यापक टी. पी. मुंडे यांनी यांनी न.प.चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून रस्त्याचा प्रश्न सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. जनतेच्या प्रश्नांवर नगरपरिषदेच्या सभापतीला उपोषणात सहभागी व्हावे लागत आहे ही शोकांतिका आहे. या सभापतींनी प्रश्न सोडायला हवा होता पण नगरपालिकेने सोडला नाही. त्यामुळे सभापती गोपाळ आंधळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रा. टी. पी. मुंडे यांनी केली.

गेल्या अनेक वर्षांपासूनची रस्त्याची या भागातील नागरिकांची मागणी आहे. ही मागणी रास्त आहे. नागरिकांसोबत आपण असून आपणही या भागातील नागरिक या नात्याने या उपोषणात सहभागी झालो आहोत

-गोपाळ आंधळे, शिक्षण समिती सभापती न. प. परळी.

===Photopath===

220621\22_2_bed_12_22062021_14.jpg

===Caption===

परळी उपोषण

Web Title: City ward no. Indefinite hunger strike of citizens in front of Municipal Council office for demand to start work on 40 feet road in 5, participation of many including NAP chairpersons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.