शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्डसाठी नागरिकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

------------------- बियाणे मोफत पुरविण्याची मागणी अंबाजोगाई : यावर्षी कोरोना संकटामुळे प्रत्येकाचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातून शेतकरीही सुटला नाही. ...

-------------------

बियाणे मोफत पुरविण्याची मागणी

अंबाजोगाई : यावर्षी कोरोना संकटामुळे प्रत्येकाचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातून शेतकरीही सुटला नाही. सध्या पावसाळा आला आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीसोबतच शेतकरी बियाणांची जुळवाजुळव करीत आहेत. मात्र आर्थिक कोंडीमुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बघता, बियाणे यावर्षी मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपाचे ॲड. संतोष लोमटे यांनी केली आहे.

--------------------

वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी

अंबाजोगाई : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू केला. त्याची थकबाकी अद्याप मिळाली नाही. ती थकबाकी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

--------------------

‘धोकादायक पुलाला कठडे लावा’

अंबाजोगाई : तालुक्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षक कठडे तुटले असून काही चोरीलाही गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आदनाक यांनी केली आहे.

-----------------

कोरोनामुळे कर्ज माफ करण्याची मागणी

अंबाजोगाई : दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि विविध योजनांतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेतून व्यवसायासाठी घेतलेले कर्ज भरणे आता कठीण होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी आता केली जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक नागरिकांनी व्यवसाय थाटण्याकरिता शहरी व ग्रामीण सुवर्ण जयंती रोजगार योजनेसह इतर योजनेतून राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेतले. मात्र लॉकडाऊनमुळे कर्जाची परतफेड करणे सद्यस्थितीत कठीण जात आहे. यासाठी अशा नागरिकांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाणे यांनी केली आहे.