शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीचे नुकसान केल्याप्रकरणी सुरेश धसांसह ३७ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती मनोज चौधरी, दोन मुले तसेच सासरे सदाशिव, सासू अंजना असे आम्ही शेती ...

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती मनोज चौधरी, दोन मुले तसेच सासरे सदाशिव, सासू अंजना असे आम्ही शेती व इतर व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागवत आहोत. माझे पती मनोज चौधरी हे समाजकार्य करीत असून विविध समाजकार्यात ते भाग घेतात. तसेच माझे सासरे सदाशिव पांडुरंग चौधरी यांच्या नावे पांढरी येथे बीड-नगर महामार्गावर जमीन गट नंबर ५९७ मध्ये २० गुंठे असून सदर जमिनीमध्ये मी रितसर एन. ए. करून घेतलेला आहे. त्या ठिकाणी संपूर्ण क्षेत्राला कंपाऊंड केले असून पक्के दोन मजली दगडी बांधकाम केलेले आहे. तिथे आम्हाला हाॅटेलचे काम करायचे होते. मी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आमदार सुरेश रामचंद्र धस यांच्याविरुद्ध मुर्शदपूर, ता. आष्टी या गटातून २०१७ साली जि.प. निवडणूक लढविली होती. तेव्हापासून ते माझ्या पतीला राजकीय प्रतिस्पर्धक समजून सूडबुद्धीने नेहमीच माझ्या पतीविरोधात लोकांना भडकावून माझ्या पतीविरुद्ध खोट्या तक्रारी देण्याचा प्रयत्न करतात, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आमच्या या जमिनीबाबत न्यायालयात सिंचन कार्यालयासोबत वाद चालू आहे. सिंचन विभागाला न्यायालयाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढली आहे. ज्यामध्ये न्यायालयाने ७ ऑगस्ट २०२१ ही तारीख दिलेली आहे. तत्पूर्वी १९ जुलै २०२१ रोजी न्यायालयात याबाबत सुनावणी झाल्यानंतर आमदार सुरेश धस व त्याचे समर्थक जेसीबी मशीनच्या साहाय्याने आमच्या जागेतील कंपाऊंड जमीनदोस्त करत आहेत व त्यातील सामान हे अज्ञात ठिकाणी घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाली. तेव्हा मी, माझे पती, माझी दोन मुले, माझे सासू-सासरे सदर जागेची पाहणी करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी आ. सुरेश धस व त्यांचे समर्थक गॅस कटर, जेसीबी पोकलेनच्या साहाय्याने माझ्या जमिनीतील कपाऊंड व बांधकाम पाडत होते. आमचे वाहन त्या ठिकाणी आलेले पाहता त्यांनी आमच्यावर दगडाने हल्ला करण्यास सुरुवात केली व त्या सर्वांच्या हातात काठ्या कु-हाडी, तलवार अशी घातक शस्त्र होती. आम्ही थेट पोलीस स्टेशनकडे निघालो. घटनेचा दबाव असल्यामुळे माझ्या पतीच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर पतीने लगेच ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे जाऊन उपचार घेतले. सदरच्या घटनेमुळे माझे लोखंडी अँगल्स डिझायन कंपाऊंड, संगमरवरी २ सिंह व माैल्यवान / डिझाइन दगड, पत्रे, पाण्याची मोटार, गॅस शेगडी व घरातील सामान १० ते १५ लाख रुपयांचे चोरून घेऊन गेले. आ. सुरेश धस, सुधीर पठाडे, रमेश वांढरे, रवींद्र पठाडे, जिया बेग, भूषण पठाडे, नितीन पोठरे, विलास भोगाडे, संभाजी भोगाडे, शिवाजी घुले यांच्यासह एकूण ३८ जण व इतर पाच जणांवर कलम १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ३३६,१७९ नुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.