शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे रक्तदान महायज्ञास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

बीड : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’तर्फे बीड येथे २ जुलै रोजी ‘लोकमत ...

बीड : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’तर्फे बीड येथे २ जुलै रोजी ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या महारक्तदान महायज्ञाला जालना रोडवरील बीड ब्लड बँकेत प्रारंभ झाला. शिबिरात ३० दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. राज्यात १५ जुलैपर्यंत रक्तदान शिबिरे होत असून दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.

कोविड संकटाच्या काळात गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने कोणाला तरी जीवनदान अर्पण करू शकतो.

रक्तपेढ्यांना रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर उपचार करतानाही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी बीड ब्लड बँकेत स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. लोकमत परिवाराच्या वतीने ब्लड बँकेच्या डॉ. अंजली नाईकवाडे, अनिल बिराजदार, अशोक नवले, वंदना मस्के, पूनम जव्हेरी आदींचे

स्वागत करण्यात आले. दिवसभरात शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

परळी, अंबाजोगाईत शिबिर

४ जुलै रोजी परळी येथे आणि ५ जुलै रोजी अंबाजोगाई येथेही रक्तदान शिबिरे होणार आहेत. सामाजिक संस्था, पक्ष, संघटना, विविध मंडळे यांना जर रक्तदान शिबिरे घेऊन या महायज्ञात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर लोकमतशी संपर्क साधावा. जर आपण रक्त देण्यास इच्छुक असाल तर आपले नाव, नंबर, शहर, पत्ता या ९६५७१०२१७८ या नंबरवर व्हॉट्स‌ॲप करा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.

---------

पुनर्जन्म मिळाला अन सुरू केले रक्तदान

माझा जीवन मरणाचा प्रश्न असताना बंधू बालाजी सपकाळ आणि डॉ. प्रभाकर येडे यांनी रक्तदान केले. त्यामुळे मला पुनर्जन्मच मिळाला. तेव्हापासून सावित्रीबाई फुले जयंती, जागतिक महिला दिन व डॉक्टर डे या दिवशी वर्षातून तीनवेळा रक्तदानाचा केलेला संकल्प आजतागायत सुरू आहे. समाजासाठी फूल ना फुलाची पाकळीइतके योगदान देण्याचा हा प्रयत्न आहे. आतापर्यंत ४० वेळा रक्तदान केले आहे. कधीच आजारी पडले नाही. मानसिक समाधान मिळते. लोकमतच्या महायज्ञात मी रक्तदान केले,आपणही नि:संकोचपणे रक्तदान करावे असे आवाहन शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्ष तथा लोकमत सखी मंचच्या विभागीय प्रतिनिधी संगीता दामोदर सपकाळ यांनी केले. त्या पारगाव शिरस केंद्रांतर्गत उमरद जहांगीर येथील जि. प. शाळेत शिक्षिका आहेत. २५ व्या रक्तदानावेळी रोटरी क्लबने नेशन बिल्डर ॲवार्डने त्यांचा सन्मान केला आहे.

---------

मी आतापर्यंत ७९ वेळा रक्तदान केले आहे. बीड शहरात रक्तासाठी गरजू फिरायचे,आणि पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण आपले रक्त विकायचे ही विदारकता लक्षात घेत माझ्यासह आचार्य सर व इतरांनी सामाजिक जाणिवेतून रक्तदान चळवळीला सुरूवात केली. आयोजित केलेल्या शिबिरांत सहभागी होत दाते उत्स्फूर्तपणे रक्तदान करू लागले. रक्तदानाचे महत्व पटल्याने चळवळ वाढत गेली. रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याबरोबरच रक्तदानाची चळवळ मजबूत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी केले.

--------