आमदारांच्या निलंबनाचा गेवराईत भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:08+5:302021-07-07T04:42:08+5:30

गेवराई : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ गेवराई तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ...

BJP protests the suspension of MLAs in Gevrai | आमदारांच्या निलंबनाचा गेवराईत भाजपकडून निषेध

आमदारांच्या निलंबनाचा गेवराईत भाजपकडून निषेध

गेवराई : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ गेवराई तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी निलंबनाचा निषेध करण्यात आला.

अधिवेशन काळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात त्यांच्या मतदारसंघातील विविध सामाजिक, शैक्षणिक, शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, कोरोनाकाळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व इतर विषयांवर भाजपा आमदारांनी सभागृहात आवाज उठवला. तो आवाज बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १२ आमदारांचे निलंबन केले. हे निलंबन निषेधार्थ असून, सदरील आमदार हे जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेले आमदार आहेत. ते मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनात सहभागी होतात. त्यांचे निलंबन करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. या निलंबनाच्या निषेधार्थ गेवराई तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जंवजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभवनकर, दादासाहेब गिरी, दीपक सुरवसे, प्रा. श्याम कुंड, यहिया खान, ईश्वर पवार उपस्थित होते.

060721\20210706_155635_14.jpg

Web Title: BJP protests the suspension of MLAs in Gevrai