शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

Beed: हॉटेलमध्ये चहा प्यायला बसले; कुख्यात गुन्हेगारांनी केला चाकूने वार, तिघांविरोधात गुन्हा

By सोमनाथ खताळ | Published: March 29, 2024 7:36 PM

Beed News: चहा पिणाऱ्या मित्रांसोबत भांडण केले. नंतर त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेत त्यांच्यावर चाकूने वार केला. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी आष्टी तालुक्यातील पांढरी टोलनाक्याजवळ घडली.

- सोमनाथ खताळबीड - चहा पिणाऱ्या मित्रांसोबत भांडण केले. नंतर त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेत त्यांच्यावर चाकूने वार केला. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी आष्टी तालुक्यातील पांढरी टोलनाक्याजवळ घडली. याप्रकरणी २८ मार्च रोजी आष्टी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, हल्ला करणारे कुख्यात आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे.

भरत उर्फ भरव पांजऱ्या काळे, कैदी पांजऱ्या काळे (दोघेही रा.आंधळेवाडी ता.आष्टी) व सचिन भामट्या उर्फ भामऱ्या काळे (रा.नागझरी ता.गेवराई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोपट चंद्रकांत पांढरे (वय ३२ रा.पांढरी ता.आष्टी) हे २६ मार्च रोजी आपले मित्र अशोक पन्हाळकर व लक्ष्मन नेमाने यांच्यासोबत टोलनाक्याजवळील हॉटेलवर चहा पित होते. याचठिकाणी या आरोपींनी त्यांच्यासोबत भांडण केले. त्यानंतर भरत काळे याने पांढरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून पळून जात होता. परंतू त्यांनी पकडले. चैन परत मागताच भरत याने पांढरे यांच्या खांद्यावर चाकुने वार केला. त्यानंतर पन्हाळकर व नेमाणे वाचविण्यासाठी धावल्यावर कैदी काळे यानेही त्यांच्यावर हल्ला केला. इतर लोकांनी त्यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले. परंतू तरीही त्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत तेथून धुम ठोकली. त्यानंतर या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर पांढरे यांनी आष्टी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून २८ मार्च रोजी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक धनवडे हे करत आहेत.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी