आईला होणाऱ्या त्रासाचा सूड वडिलांचा खून करून घेतला; १९ वर्षीय मुलगा चार तासांत अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:35 IST2026-03-30T16:33:56+5:302026-03-30T16:35:07+5:30

Beed Crime: रोजच्या कटकटीला वैतागून टोकाचे पाऊल; बापाचा खून करून छत्रपती संभाजीनगरला पळाला, पण आष्टी पोलिसांनी ४ तासांत गाठलं

Beed Crime: In Kada bus stand area 19-year-old son killed father to avenge mother's troubles; arrested within four hours | आईला होणाऱ्या त्रासाचा सूड वडिलांचा खून करून घेतला; १९ वर्षीय मुलगा चार तासांत अटकेत

आईला होणाऱ्या त्रासाचा सूड वडिलांचा खून करून घेतला; १९ वर्षीय मुलगा चार तासांत अटकेत

-नितीन कांबळे
कडा (बीड):
कडा बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटे उघडकीस आलेल्या पित्याच्या खून प्रकरणाचा आष्टी पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला आहे. आईला होणारी मारहाण आणि रोजच्या कौटुंबिक वादाला कंटाळून १९ वर्षीय मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी करण अनिल मुळे याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथून ताब्यात घेतले असून, आष्टी पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मूळचे पिसादेवी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असलेले हे कुटुंब कडा येथे भंगार गोळा करून उदरनिर्वाह करत होते.

रोजच्या कटकटीला वैतागून टोकाचे पाऊल
मृत अनिल सजन मुळे (वय ५०) हे दारूच्या नशेत रोज पत्नीला मारहाण आणि मुलाला त्रास देत असत. रविवारी रात्री देखील घरात मोठा वाद झाला होता. या रोजच्या भांडणामुळे मुलगा करण प्रचंड संतापला होता. सर्वजण झोपल्यानंतर करणने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जीव घेतला. हत्येनंतर त्याने तातडीने कडा येथून पळ काढला आणि खुलताबाद गाठले.

तांत्रिक विश्लेषण आणि ४ तासांचा थरार
घटनेची माहिती मिळताच आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी तपास पथके रवाना केली. पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, भाऊसाहेब आहेर आणि बब्रुवाण वाणी यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलीस पथकाने तातडीने खुलताबाद येथे धाव घेऊन आरोपी करणला बेड्या ठोकल्या. गुन्ह्याची कबुली त्याने दिली असून कौटुंबिक छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.

आष्टी पोलिसांच्या कामगिरीची चर्चा
अवघ्या चार तासांत आरोपीला जेरबंद केल्यामुळे पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे. पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे. दारूच्या व्यसनामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा भयानक अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title : माँ पर अत्याचार का बदला लेने के लिए बेटे ने पिता को मारा; घंटों में गिरफ्तारी

Web Summary : बीड के कड़ा में एक 19 वर्षीय लड़के ने अपनी माँ के लगातार दुर्व्यवहार के कारण अपने पिता की हत्या कर दी। खुलताबाद में उसे चार घंटे के भीतर गिरफ्तार कर लिया गया। बेटे ने असहनीय घरेलू हिंसा को मकसद बताते हुए कबूल किया। पुलिस आगे जांच कर रही है।

Web Title : Son Kills Father to Avenge Mother's Abuse; Arrested in Hours

Web Summary : A 19-year-old killed his father in Kada, Beed, due to constant abuse of his mother. He was arrested within four hours in Khultabad. The son confessed, citing unbearable domestic violence as the motive. Police are investigating further.