शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खाट-खाट पुन्हा सुरू.. तिकिटाच्या ५५० मशीन बिघडल्या, ११६ ट्रेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

सोमनाथ खताळ बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना पुन्हा आता खाट-खाट असा आवाज यायला सुरुवात झाली आहे. ...

सोमनाथ खताळ

बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना पुन्हा आता खाट-खाट असा आवाज यायला सुरुवात झाली आहे. तिकीट देणाऱ्या तब्बल ५५० इलेक्ट्रॉनिक मशीन बिघडल्या आहेत. त्याच्या दुरूस्तीला महामंडळाकडे निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या पद्धतीच्या ११६ ट्रे मशीनचा वापर सुरू झाला आहे. परंतु, काही वाहकांना याचे प्रशिक्षणच दिलेले नसल्याने ते याला वैतागले आहेत.

जिल्ह्यात साधारण २००९ पासून इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट देणे सुरू झाले. यासाठी रापमने खासगी कंपनीकडून या मशीन खरेदी केल्या. यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला. त्यानंतर साधारण २०१५ मध्ये पुन्हा नव्याने मशीन खरेदी केल्या. यात वारंवार बिघाड होत गेले. याच्या दुरूस्तीवरही महामंडळाला खर्च करावा लागला. आता मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे बसेस जागेवरच उभा आहेत. त्यातच जिल्ह्यातील १ हजार ९४ पैकी तब्बल ५५० मशीन बंद पडल्या आहेत. याची दुरूस्ती केली जात नसल्याने जुन्या खाट- खाट वाजणाऱ्या ट्रे मशीनचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे नवख्या वाहकांना यासाठी वेळ लागत असून, ते वैतागल्याचे सांगण्यात आले.

वाहकांना प्रशिक्षणाची गरज

जुन्या मशीनचे प्रशिक्षण साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी देण्यात आलेले आहे. तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले. परंतु इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे जुन्या ट्रे वापराचा विसर पडला आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना नव्याने आठवडाभराचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी वाहकांसह संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर यांनी केली आहे. प्रशिक्षण नसल्याने चुकीचे तिकीट जाण्यासह कारवाईही अंगलट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

---

इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये तिकिटामागे दर आकारणी केली जाते. ते परवडणारे नाही. तसेच मशीनमध्येही बिघाड आहे. महामंडळाकडे निधी नसल्याने जुन्या मशीन सुरू केल्या आहेत. याचे प्रशिक्षण आगोदरच वाहकांना दिलेले आहे.

अजय मोरे, विभाग नियंत्रक, बीड

---

आगारनिहाय आकडेवारी

आगारइलेक्ट्रॉनिक मशीनबिघाड ट्रेचा वापर

बीड १९७ १२५ २०

परळी १८४ ७६ १९

धारूर १०६ ४० २२

माजलगाव ११७ ६८ १८

गेवराई १०९ ५६ १२

पाटोदा ९७ ४० ९

आष्टी ११९ ६१ ००

अंबाजोगाई १६४ ८४ १८

एकूण १०९३ ५५० ११६