बर्दापूरकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:18+5:302021-07-07T04:41:18+5:30

येथील योगेश्वरी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.आर. आर. बर्दापूरकर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त गुरुवारी महाविद्यालयात त्यांचा सत्कार झाला. ...

Bardapurkar felicitated for retirement | बर्दापूरकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

बर्दापूरकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

येथील योगेश्वरी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.आर. आर. बर्दापूरकर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त गुरुवारी महाविद्यालयात त्यांचा सत्कार झाला. सेवा कालावधीत त्यांचे शैक्षणिक कार्यात मोलाचे

योगदान असल्याचे संस्थेचे पदाधिकारी

कमलाकरराव चौसाळकर यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गणपत व्यास होते. सहसचिव प्रा. एन. के. गोळेगावकर, प्रा. एस. एस. देशमुख, प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी, उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. व्ही. एन. जोशी, उपप्राचार्य प्रा. पंडित कऱ्हाड हे उपस्थित होते.

यावेळी गणपत व्यास व प्रा. गोळेगावकर यांनी प्रा. बर्दापूरकर यांच्या अध्यापन पध्दतीचे कौतुक केले. याप्रसंगी श्री व सौ. बर्दापूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. जुक्टा संघटनेतर्फे प्रा. के. के. ठाकूर, प्रा. डॉ. आर. एच. थोरात यांनीही सत्कार केला. प्रा. राहुल चिलवार, प्रा. नीलिमा कुमठेकर, प्रा. जी. पी. कुलकर्णी, प्रा. दीपक देवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. बर्दापूरकर यांनी संस्थेला एक लाख रुपयाची देणगी दिली. उपप्राचार्य प्रा. व्ही. एन. जोशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन कऱ्हाड यांनी केले.

Web Title: Bardapurkar felicitated for retirement