स्वाराती महाविद्यालयात बालगंधर्व स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST2021-07-17T04:26:01+5:302021-07-17T04:26:01+5:30

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. आर थारकर अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात त्यांनी बालगंधर्वांच्या आणि नरहर कुरूंदकरांच्या कार्य कर्तृत्व प्रेरणादायी ...

Balgandharva Memorial Day at Swarati College | स्वाराती महाविद्यालयात बालगंधर्व स्मृतिदिन

स्वाराती महाविद्यालयात बालगंधर्व स्मृतिदिन

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. आर थारकर अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात त्यांनी बालगंधर्वांच्या आणि नरहर कुरूंदकरांच्या कार्य कर्तृत्व प्रेरणादायी असल्याचे सांगत नाट्यशास्त्र विभागात होणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल ,प्रा. पी. सी. गादेकर यांनी सुश्राव्य गीत गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली. कार्यक्रमाचे संचालन करताना नाट्यशास्त्र विभाग प्रमुख संपदा कुलकर्णी यांनी नरहर कुरूंदकरांच्या चौफेर ,आणि मूलभूत समीक्षेची वैशिष्ट्ये सांगत, बालगंधर्वांचे रंगकर्म म्हणजे चमत्कार वाटावा, असे सांगत त्यांच्या विविध भूमिकांबाबत माहिती सांगितली. या कार्यक्रमात वाणिज्य विभाग प्रमुख डॉ ममता राठी यांच्या हस्ते प्राचार्यांचे तर राज्यशास्त्राचे प्रा. डॉ. बी. के भाबरदोडे यांच्या हस्ते प्रा. पी. सी. गादेकर यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांचे आभार डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले.

160721\img-20210715-wa0087.jpg

स्वाराती महाविद्यालयात कार्यक्रम

Web Title: Balgandharva Memorial Day at Swarati College