शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिका पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:29 IST

पतीस तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, दंड अंबाजोगाई : शिक्षिका असलेल्या पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवून तीन ...

पतीस तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, दंड

अंबाजोगाई : शिक्षिका असलेल्या पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा अंबाजोगाई येथील अपर सत्र न्यायाधीश एस.एस.सापटनेकर यांनी शनिवारी ठोठावली. श्रीधर पंढरी गायकवाड रा.दहीफळ ता.केज असे आरोपीचे नाव आहे.

केज तालुक्यातील दहीफळ येथील मनिषा श्रीधर गायकवाड या शिक्षिका आहेत. त्यांचे पती श्रीधर गायकवाड यास दारूचे व्यसन होते. व्यसनामुळे तो सतत पत्नीचा शारीरिक व मानसी छळ करत असे. २८ सप्टेंबर २०१५ रोजी श्रीधर याने पत्नीकडे बिअर शॉपी टाकण्यासाठी पैशाची मागणी केली. पत्नीने पैसे देण्यास नकार दिला असता, श्रीधर याने घरातील रॉकेलची भरलेली कॅन घेऊन शिक्षिका असलेल्या पत्नीच्या अंगावर टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद केज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

पोलिसांनी श्रीधर गायकवाड याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला व आरोपीस अटक केली. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अपर सत्र न्यायालयात आले. न्या.एस.एस. सापटनेकर यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील रामेश्‍वर ढेले यांनी आरोपी विरुद्धचे सादर केलेले ठोस पुरावे व त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी श्रीधर गायकवाड यास तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. रामेश्‍वर ढेले यांनी काम पाहिले.