शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांवर मुलाचा प्राणघातक हल्ला, आईचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : संस्कृतीला काळिमा फासणारी घटना तालुक्यातील घाटशीळ पारगांव येथे पितृ दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. विकृत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : संस्कृतीला काळिमा फासणारी घटना तालुक्यातील घाटशीळ पारगांव येथे पितृ दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. विकृत मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच काठीने अमानुष मारहाण करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. तर, वडील अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेचा फारसा बोलबाला झाला नाही मात्र, सदरील घटनेचा रविवारी सकाळी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिकची माहिती अशी, त्र्यंबक विश्वनाथ खेडकर (वय ७५) व त्यांची पत्नी शाहूबाई त्र्यंबक खेडकर (वय ७०) हे आपल्या मुलासह शेतात घरी राहत होते. त्यांना बाबासाहेब (दादासाहेब) त्र्यंबक खेडकर या त्यांच्या ४५ वर्षीय मुलाने शनिवारी साडेचारच्या सुमारास काठीने अमानुष मारहाण केली. वयस्कर आई-वडिलांना काठीने जबर मारहाण करताना त्यांच्या केविलवाण्या किंकाळ्या सुध्दा या विकृत मुलाला पाझर फोडू शकल्या नाहीत. काठीचा वर्मी घाव बसल्याने आईचा मृत्यू झाला तर वडिलांना अहमदनगर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

....

मायेपोटी आले होते भेटायला

सततच्या त्रासामुळे त्याचे आई, वडील देखील मुलीकडे असतात. मात्र, मुलाला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता म्हणून दोघेही त्याला मायेपोटी भेटण्यास आले होते. या दोघांनाही मारहाण झाल्यानंतर ग्रामस्थांनी उपचारासाठी अहमदनगरला नेले. मात्र, उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला. तर, वडील अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली.

...

मयत झालेल्या शाहूबाई खेडकर या सत्तर वर्षीय आईची उत्तरीय तपासणी नगर येथे सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांना माहिती मिळाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करून आईचा खून करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

...

विकृत स्वभावामुळे पत्नी, मुले दुरावली

आईची हत्या करणारा आबासाहेब उर्फ दादासाहेब खेडकर याच्या विकृत स्वभावामुळे त्यांची पत्नी व मुले देखील जवळ राहत नाहीत. त्याची पत्नी मुलाला घेऊन माहेरी राहत आहेत. तर, त्याच्या या वागण्यामुळे आई, वडील देखील बहिणीकडे राहत होते. दरम्यान आरोपीला काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्यामुळे आई-वडील भेटण्यासाठी आले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

....