शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी वाहनचालकांची उतरणार ‘नशा’!

By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST

सोमनाथ खताळ , बीड ‘थर्टी फर्स्ट’चा ‘एन्जॉय’ करायचाच, असा संकल्प अनेकांनी केला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘फुल्ल’ दारू प्यायची आणि वाहने चालवायची असे प्रकार घडतात.

सोमनाथ खताळ , बीड‘थर्टी फर्स्ट’चा ‘एन्जॉय’ करायचाच, असा संकल्प अनेकांनी केला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘फुल्ल’ दारू प्यायची आणि वाहने चालवायची असे प्रकार घडतात. त्यामुळे अपघातही वाढतात तर अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडते. मात्र यावर उपाययोजना म्हणून बीड पोलीस दलाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून मद्यपी वाहनचालकांची ‘ब्रिथ अ‍ॅनलायझर’ मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे, या मोहिमेला सुरूवातही झाली आहे.मावळत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करायचे, असे प्रत्येकाने नियोजन केले आहे. यामध्ये अनेकजन दारू पितात, तर काही सामाजिक उपक्रम राबवितात. मात्र मद्यपान करून ‘थर्टी फर्स्ट सेलीब्रेट’ करायचा. यामध्ये सुशिक्षीत व्यक्तींसह तरूणाईचा मोठा समावेश असतो. २० ते ३० वयोगटातील युवक असे प्रकार जास्तीत जास्त करीत असल्याचेही दिसून येते. मात्र मद्यपान करणे आणि त्यातली त्यात मद्यपान करून वाहन चालविणे हा गुन्हा असून सुद्धा आणि आपल्या जीवाला धोकादायक असतानाही अनेकजन असे प्रकार सर्रास करतात. त्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत. मात्र यावर्षी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्चा ‘एन्जॉय’चा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी सांगितले.चौका-चौकांत नाकाबंदीशहर वाहतूक शाखेकडून चौकाचौकात नाकाबंदी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश घोडके यांनी सांगितले. यासाठी सगळी तयारी झाली असल्याचे सपोनि एम.ए.सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलातना सांगितले.पोलीस रात्रभर गस्तीवर४‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री अनेक तरूण दारू पिवून तर्रर्र झालेले असतात, अशातच ते वाहने चालवित असल्याने त्यांना व इतरांना याचा धोका पोहचण्याची दाट शक्यता असते, यावर नियंत्रण रहावे यासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात त्या ठाण्याच्या हद्दीत अधिकाऱ्यांसह कर्मचारी रस्त्यावर उतरून तपासणी करतील, असेही डोंगरे यांनी सांगितले.