शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:59 IST

विभागीय आयुक्तांनी काढला आदेश, आरडीसी असतील समन्वय अधिकारी

बीड : जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपात तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतील मागील ५ वर्षांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच अनुदान प्राप्त झाले का? याची शहानिशा करण्यासाठी जिल्हानिहाय चौकशी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. सदरील पथकांनी आपला अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करावा, असा आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पथकप्रमुखांना दिला आहे.

जालना जिल्ह्यात २०१९ ते २०२२ दरम्यान नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी देण्यात आलेल्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जालना जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नेमून अनुदान प्रकरणाचा सखोल तपास केला. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपात तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. चौकशी समितीने अहवाल सादर केला असून या प्रकरणात २६ तलाठी, १७ कृषी सहायक व ३१ ग्रामसेवक दोषी आढळले. दरम्यान, सदरील घोटाळ्याच्या अनुषंगाने आता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत अनुदान वाटपाची चौकशी करण्याचा आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पथकप्रमुखांना दिला आहे.

कोणती होणार चौकशी..?मागील पाच वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानासंबंधी सखोल तपासणी केली जाणार आहे. सदरील अनुदान मयत व्यक्ती, शेतकरी नसलेले व्यक्ती, शासकीय तसेच अकृषक जमिनीवर शेती दाखवून अनुदान वितरित केलेले व्यक्ती, एकापेक्षा अधिक वेळा वितरित केलेले अनुदान झाले किंवा कसे याची तपासणी केली जाणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हे तपासणी पथकाचे समन्वय अधिकारी असतील. तपासणी पथकास मागील ५ वर्षांतील अनुदान वितरित केलेल्या अद्ययावत याद्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पथके केली नियुक्तमराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यातील चौकशीसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. एका जिल्ह्यातील अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यातील अनुदान वाटपाची चौकशी करणार आहे. बीड अपर जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व लेखा अधिकारी हे छत्रपती संभाजीनगर तर बीड जिल्ह्याची चौकशी छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व लेखा अधिकारी हे करतील. असे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयMarathwadaमराठवाडा