शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कचरा दिसल्यावर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST

लोकमत इम्पॅक्ट लोकमत न्यूज नेटवर्क केज : ओला व सुका कचरा टाकण्यास कचराकुंड्या नगरपंचायतीने बसवल्या नाहीत. त्यामुळे घरातील कचरा ...

लोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : ओला व सुका कचरा टाकण्यास कचराकुंड्या नगरपंचायतीने बसवल्या नाहीत. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर टाकला जातो. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच केज नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील रस्त्यावर घाण अथवा कचरा दिसून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

केज नगर पंचायतीने ओला व सुका कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या शहरात बसवल्या नसल्याने घरातील व दुकानातील ओला व सुका कचरा टाकण्यास शहरातील लोकांनी रस्त्याची निवड केली आहे. मंगळवार पेठेसह शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यास सुरवात केली. याबाबत ‘लोकमत’ने ‘केजचे मंगळवार पेठ बनले कचरा डेपो’ हे वृत्त २७ जून रोजी प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल केज नगर पंचायतीचे प्रशासक शरद झाडके यांनी गुरुवारी(१ जुलै) रोजी केज नगर पंचायतीत नगर पंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह केज शहरातील कचरा उचलण्याचे टेंडर घेतलेल्या गुत्तेदाराची बैठक घेतली. शहरातील रस्ते कचरामुक्त करण्यासह शहरातील नाल्याची साफसफाई करणे आदीबाबत सूचना त्यांनी केल्या. शहरातील नाल्या व रस्त्यावर कचरा अथवा घाण दिसून आल्यावर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहरातील सर्व प्रभागात स्वच्छता करावी, असेही त्यांनी बैठकीत कर्मचाऱ्यांना सांगितले. घनदाट वृक्ष लागवडीबाबतही त्यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

...

अचानक भेट देऊन करणार पाहणी

नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शहरातील रस्ते कचरामुक्त करण्यासह नाल्याची साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी अचानक केव्हाही भेट देऊन पाहणी करणार आहे. रस्त्यावर घाण आढळून आल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही शरद झाडके यांनी सांगितले.

....

कंत्राटदारास बजावली नोटीस

केज शहरातील नाल्यांतील घाण काढणे, कचरा उचलणे यासाठीचे कंत्राट घेतलेल्या गुत्तेदाराने ७४ कामगार कामावर ठेवणे आवश्यक असताना त्याच्याकडे ५४ कामगार असल्याने आढळून आले आहेत. याबाबत त्यास नोटीस बजावण्यात आली आहे. नगर पंचायतीच्या २४ कायम स्वच्छता कामगारांकडे शहरातील रस्ते सफाईचे काम आहे.

-शरद झाडके, केज नगरपंचायत, प्रशासक.